4th OMAA Invitational Karate Championship 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Karate Championship: कुळेच्या कराटेपटूंकडून पदकांची लयलूट, 'ओएमएए' आमंत्रणात्मक कराटे चॅम्पियनशिपमध्ये यश

4th OMAA Invitational Karate Championship 2026: कुळे परिसरातील कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत विविध गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: चौथी ‘ओएमएए’ आमंत्रणात्मक कराटे चॅम्पियनशिप २०२६ अंतर्गत आयोजित गोवा स्कूल ऑफ ओकिनावा मार्शल आर्ट्‌स स्पर्धेत कुळे परिसरातील कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत विविध गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे.

ब्राऊन बेल्ट गटात रिचा सावंत हिने काता आणि स्पारिंग या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत दुहेरी यश मिळवले. ब्ल्यू बेल्ट गटात साहिल स्वामी याने काता आणि स्पारिंगमध्ये कांस्यपदके मिळवली, तर प्राज्ञा नाईक हिने कातामध्ये सुवर्ण आणि स्पारिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. ऋत्वी नाईक हिने कातामध्ये सुवर्णपदक मिळवत आपली छाप पाडली. श्रेयांग वेलीप याने स्पारिंगमध्ये कांस्य, तर कैवल्य देसाई याने रौप्यपदक पटकावले.

ग्रीन बेल्ट गटात आराध्या चौधरी हिने स्पारिंगमध्ये कांस्यपदक मिळवले, तर पंचमी द्रोपतोकार हिने रौप्यपदकाची कमाई केली. ऑरेंज बेल्ट गटातील यश्वी स्वामी हिने काता आणि स्पारिंग या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.

यलो बेल्ट गटात उर्वांश खेडेकर याने स्पारिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. साक्षी राठोड हिने कातामध्ये रौप्य आणि स्पारिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. खुशी सुलदाल आणि यश कोल्लानाटी यांनी कातामध्ये सुवर्ण आणि स्पारिंगमध्ये रौप्यपदके मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. ब्लॅक बेल्ट गटात दिव्या देसाई हिने स्पारिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले, तर सलोनी उसपकर हिने रौप्यपदकाची कमाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT