Footbal I League 2024 X
गोंयचें खेळामळ

I League 2024: चर्चिल ब्रदर्सच्या पदरी पुन्हा निराशा! श्रीनिदी डेक्कनचा 2-1 ने विजय; आता प्रतीक्षा बंगळूरविरुद्धच्या सामन्याची

Churchill Brothers Vs Sreenidi Deccan: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी हैदराबाद येथे डेक्कन श्रीनिदी संघाने २-१ अशा फरकाने पूर्ण तीन गुण प्राप्त केले, त्यामुळे गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सची स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली.

गोमन्तक डिजिटल टीम

Footbal I League 2024 Churchill Brothers Vs Sreenidi Deccan

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी हैदराबाद येथे डेक्कन श्रीनिदी संघाने २-१ अशा फरकाने पूर्ण तीन गुण प्राप्त केले, त्यामुळे गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सची स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली.

फैझल शायेस्तेह याने २३ व्या थेट फ्रीकिवर पहिला गोल केला. नंतर अँजेल गोन्झालेझ याने ७३ व्या मिनिटास अगदी जवळून गोल केला. त्यामुळे श्रीनिदी डेक्कनपाशी दोन गोलची मजबूत आघाडी जमा झाली. स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

मागील लढतीत त्यांना घरच्या मैदानावर गोकुळम केरळाविरुद्ध ३-२ फरकाने निसटता पराभव पत्करावा लागला होता. श्रीनिदी डेक्कनचे आता दोन लढतीनंतर तीन गुण झाले आहेत. आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सविरुद्धच्या सात सामन्यांतील श्रीनिदी डेक्कनचा हा पाचवा विजय ठरला. अन्य दोन लढतीत बरोबरीत राहिल्या आहेत.

चर्चिल ब्रदर्सची पिछाडी ९०+१ व्या मिनिटास लामगौलेन सेमखोलून याने एका गोलने कमी केली. पहिल्या लढतीत शिलाँग लाजाँगविरुद्ध २-२ अशी गोलबरोबरी नोंदविलेल्या माजी विजेत्यांचा दोन लढतीनंतर एक गुण कायम आहे. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना चार डिसेंबर रोजी बंगळूर येथे स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT