Umesh Dhavalikar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Transplant Sports: राष्ट्रीय ‘ट्रान्सप्लांट’ स्पर्धेत गोमंतकीय उमेशची भरारी; दोन सुवर्ण, एका ब्राँझपदकाची कमाई

Umesh Dhavalikar: उमेश याने पाच किलोमीटर चालणे आणि २०० मीटर धावणे या प्रकारात ४० वर्षांवरील वयोगटात सुवर्णपदक पटकावले.

Sameer Panditrao

पणजी: पाचव्या राष्ट्रीय ट्रान्सप्लांट क्रीडा स्पर्धेत गोव्याचा एकमेव स्पर्धक उमेश ना. ढवळीकर याने दोन सुवर्ण आणि एका ब्राँझपदकाची कमाई केली. ‘पीजीआय’ या वैद्यकीय शिक्षण संस्थेने ‘रोट्टो’ या अवयव ट्रान्सप्लांट ट्रस्टच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा चंडीगड येथे झाली.

उमेश याने पाच किलोमीटर चालणे आणि २०० मीटर धावणे या प्रकारात ४० वर्षांवरील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. ४० वर्षांवरील आणि ४० वर्षांखालील अशा दोन वयोगटांत स्पर्धा झाली.

अवयव अकार्यक्षम ठरल्यानंतर नातेवाईकांच्या अथवा इतरांच्या अवयव दानामुळे पुनर्जीवन मिळालेल्या तसेच अवयवदान करणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी ही स्पर्धा होती. देशभरातील अनेक राज्यांतून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते.

या ट्रान्सप्लांट स्पर्धा दरवर्षी देशात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. उमेश याने या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेत तीन पदके जिंकली. गोव्यातून सहभाग घेणारे उमेश एकमेव स्पर्धक होता.भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी कर्णधार राजपाल यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. अवयव दानामुळे रुग्णांचे प्राण वाचायला मोठी मदत होते. दुसऱ्याला पुनर्जीवन मिळवून देणे हे फार मोठे काम आहे, असे विजेत्यांचे अभिनंदन करताना राजपाल यांनी सांगितले.

दशकभरापूर्वी यकृत झाले निकामी

२०१५ मध्ये अचानक उद्‍भवलेल्या यकृताच्या आजारामुळे उमेश याचे यकृत निकामी ठरले ठरू लागले होते. त्या आणीबाणीच्या प्रसंगी उमेश याला बहीण संगीता विक्रम नायक यांनी आपले यकृत दान करून जीवदान दिले. डॉ. सोनल अस्थाना आणि डॉ. मॅथ्यू जेकब या यकृत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बंगळूर येथील इस्पितळात एप्रिल २०१५ मध्ये दोघांच्याही शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. यातून सावरल्यानंतर उमेश आणि संगीता दोघांनीही शारीरिक आणि मानसिक फिटनेसवर भर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT