Margao under 13 chess championship Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FIDE World Cup: फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्‍घाटन! 82 देशांतील 206 खेळाडूंचा सहभाग

FIDE World Cup Chess Tournament: फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‍घाटन शुक्रवारी संध्याकाळी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फिडे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद म्हणजे भारतीय बुद्धिमत्ता, संयम आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव महोत्सव असल्याचे मत केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‍घाटन शुक्रवारी संध्याकाळी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाले. स्पर्धेची पहिली फेरी शनिवारी (ता. १) बार्देश तालुक्यातील हडफडे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळली जाईल.

उदघाटन सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, फिडेचे अध्यक्ष आर्काडी द्वोर्कोविच, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग, गोव्याचे क्रीडा सचिव संतोष सुखदेवे, गोव्याचे क्रीडा संचालक अजय गावडे यांची उपस्थिती होती. स्पर्धेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश नारंग यांनी यावेळी वाचून दाखविली.

पंतप्रधान मोदी यांनी स्पर्धेला शुभेच्छा व सुयश चिंतिले. डॉ. मांडविय म्हणाले, की ‘‘हा केवळ गोवा किंवा भारतासाठी ऐतिहासिक क्षण नसून जागतिक बुद्धिबळासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वकरंडकाचे यजमानपद सांभाळणे हे भारतासाठी गौरवास्पद आहे. हा नवा भारत आहे. भारतीय बुद्धीच्या युद्धभूमीतही बाजी मारत आहेत. बुद्धिबळातून भारतीय संस्कृती प्रतिबिंबित होत आहे.’’ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की देशात २३ वर्षांनंतर होणारी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा साऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.

एकूण आठ फेऱ्यांत चुरस

एकूण आठ फेऱ्यांची ही बाद फेरी पद्धतीने होणारी स्पर्धा खेळली जाईल. प्रत्येक फेरीत क्लासिकल पद्धतीचे (स्टँडर्ड टाईम कंट्रोल) दोन डाव, त्यात बरोबरी झाल्यास तिसऱ्या दिवशी रॅपिड-ब्लिट्झ डावांचा टायब्रेक असे स्वरुप आहेत. २६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतून २०२६ मधील जगज्जेता आव्हानवीरांच्या कँडिडेट बुद्धिबळ स्पर्धेसाठी तीन खेळाडू पात्र ठरतील, साहजिकच गोव्यातील विश्वकरंडक स्पर्धेस महत्त्व प्राप्त झाले आहे. सहभागी अव्वल ५० मानांकित बुद्धिबळपटूंना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. इतर १५६ खेळाडू एक ते तीन नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पहिल्या फेरीत खेळतील. स्पर्धेत ८२ देशांतील २०६ बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे.

विश्वकरंडक अनुभव विलक्षण : दिव्या

महिलांतील विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेची भारताची १९ वर्षीय दिव्या देशमुख गोव्यात होणाऱ्या फिडे विश्वकरंडक स्पर्धेत वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे खेळत आहे. या स्पर्धेतील ती एकमेव महिला आहे. तिने यावेळी सांगितले, की ‘‘(महिलांची) विश्वकरंडक स्पर्धा मी यापूर्वी जिंकलेली आहे आणि आता या विश्वकरंडकात खेळण्याचा अनुभव विलक्षण असेल. या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याबाबत मी स्वतःला भाग्यवान मानते. विश्वकरंडक स्पर्धा खूप दमवणारी असते, पण गोव्यातील वातावरणात मी ताणरहीत असेन. येथील समुद्रकिनारे ताणमुक्त होण्यास मदत करतील.’’

विजेत्याला मिळणार ‘विश्वनाथन आनंद करंडक’

फिडे विश्वकरंडक (खुल्या) विजेत्याला विश्वनाथन आनंद करंडक देण्यात येणार आहे. या करंडकाचे समारंभात मान्यवरांहस्ते अनावरण करण्यात आले. बुद्धिबळाचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मानवंदना देण्यासाठी हा करंडक दिला जाईल, असे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT