ISL 2024-25 FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: एफसी गोवाचे विजयी वर्चस्व! मोहम्मेडन स्पोर्टिंगला धूळ चारली; ग्वॉर्रोचेना ठरला गोलचा मानकरी

FC Goa Vs Mohammedan SC: मानोलो मार्केझ यांनी सामन्याच्या सुरुवातीस संघातील आठ नियमित खेळाडूंना विश्रांती देत यंदा जास्त खेळण्यास न मिळालेल्या खेळाडूंना संधी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

ISL 2024-25 FC Goa Vs Mohammedan Sporting Club

पणजी: एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात विजयी वर्चस्व राखताना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला २-० असे आरामात नमविले. विजयासह त्यांनी साखळी फेरीतील घरच्या मैदानावरील मोहीम संपविली.

आरोग्याच्या कारणास्तव पंजाब एफसीविरुद्ध मागील सामन्यात मुकलेल्या स्पॅनिश इकर ग्वॉर्रोचेना याने ४०व्या मिनिटास एफसी गोवाचे गोलखाते उघडले. सेटपिसेसवर हा गोल झाला. देयान द्राझिच याच्या कॉर्नरवर आयुष छेत्री याने दिलेल्या हेडिंग पासवर ग्वॉर्रोचेनाचा हेडर भेदक ठरला.

३२ वर्षीय आक्रमक मध्यरक्षकाचा हा यंदाच्या स्पर्धेतील सातवा गोल ठरला. नंतर ८६व्या मिनिटास ग्वॉर्रोचेना याचे हेडिंग निर्णायक ठरले आणि एफसी गोवाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी झटापटीत झालेला गोल मोहम्मेडन स्पोर्टिंगचा गोलरक्षक पदम छेत्री याच्या नावे स्वयंगोल नोंदीत झाला.

मानोलो मार्केझ यांनी सामन्याच्या सुरुवातीस संघातील आठ नियमित खेळाडूंना विश्रांती देत यंदा जास्त खेळण्यास न मिळालेल्या खेळाडूंना संधी दिली. तरीही लीग शिल्डच्या शर्यतीत उपविजेत्या ठरलेल्या संघाचेच वर्चस्व कायम राहिले.

पहिलाच सामना खेळणारा एफसी गोवाचा गोलरक्षक लारा शर्मा याला सामन्यात बहुतांश वेळ प्रेक्षकाच्याच भूमिकेत राहावे लागले. बचावपटू सानाटोंबा सिंग यालाही प्रथमच संघात स्थान मिळाले. एफसी गोवाचा अखेरचा साखळी सामना ८ मार्च रोजी कोलकात्यात लीग शिल्ड विजेत्या मोहन बागानविरुद्ध होईल.

१४ विजय, ४८ गुण

एफसी गोवाचे आता २३ सामन्यांतून ४८ गुण झाले असून त्यांचा हा स्पर्धेतील सलग पाचवा, तर एकंदरीत १४वा विजय ठरला. त्यांनी अगोदरच साखळी फेरीतील द्वितीय स्थानासह करंडकाची उपांत्य फेरी गाठलेली आहे. मोहम्मेडन स्पोर्टिंगला १५वा पराभव पत्करावा

लागला. त्यामुळे त्यांचे २३ सामन्यांनंतर १२ गुण आणि शेवटचे तेरावे स्थान कायम राहिले. पहिल्या टप्प्यात त्यांनी एफसी गोवास १-१ गोलबरोबरीत रोखले होते.

दृष्टिक्षेपात सामना

एफसी गोवाचा यंदा स्पर्धेतील सर्व २३ सामन्यांत गोलचा विक्रम

स्पर्धेत एफसी गोवाच्या ८ क्लीन शीट्स

स्पर्धेत एफसी गोवाचे एकूण ४३ गोल, मोहन बागाननंतर

(४५ गोल) क्रम

मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध एफसी गोवाचे २ सामन्यांत

१ विजय व १ बरोबरी

एफसी गोवाचे फातोर्ड्यात यंदा १२ सामने, ८ विजय,

२ बरोबरी, २ पराभव

इकर ग्वॉर्रोचेनाचे १८ सामन्यांत ७ गोल व ३ असिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT