FC Goa vs Sporting Club Delhi ISL 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2026: अपराजित 'FC Goa', नोंदवला सलग दुसरा विजय; स्पोर्टिंग क्लब दिल्लीचा 1-0 ने पराभव

FC Goa vs Sporting Club Delhi ISL 2026: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना एफसी गोवाने सलग दुसरा विजय नोंदविला

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना एफसी गोवाने सलग दुसरा विजय नोंदविला, पण सामन्यावर वर्चस्व राखूनही स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध १-० अशा निसटत्या फरकाने जिंकल्याची सल राहिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत सर्बियन देयान द्राझिच याने ४३व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला, मात्र त्यानेच ६०व्या मिनिटास पेनल्टी फटका क्रॉसबारवरून मारल्यामुळे एफसी गोवाचा विजय एका गोलपुरता मर्यादित राहिला.

एफसी गोवाने मागील लढतीत मोहम्नेडन स्पोर्टिंगला दोन गोलने हरविले होते. एफसी गोवाचे आता तीन सामन्यांतून दोन विजय व एका बरोबरीसह सात गुण झाले आहेत. ते आता अव्वल बनले आहेत. त्यांचा पुढील सामना पाच मार्च रोजी ईस्ट बंगालविरुद्ध कोलकाता येथे खेळला जाईल.

स्पोर्टिंग क्लब दिल्लीला सलग तिसऱ्या लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते अजूनही शून्य गुणांसह तळाच्या चौदाव्या स्थानी आहेत.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना आकाश संगवान याच्या लाजवाब क्रॉस पासवर देयान याने बॉक्समधे घसरत उजव्या पायाने चेंडूला योग्य दिशा दाखविली. यावेळी गोलरक्षक नोरा फर्नांडिस पूर्णपणे चकला. खेळातील तासाभरात एफसी गोवास मोसमातील तिसरा पेनल्टी फटका मिळाला. स्पोर्टिंग क्लब दिल्लीच्या खेळाडूने यावेळी गोलक्षेत्रात चेंडू हाताळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT