Javier Siverio FC Goa Dainik Gomatnak
गोंयचें खेळामळ

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

FC Goa: सिव्हेरियो याच्या उपयुक्ततेविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘हावियर हमखास गोल नोंदविणारा आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व संघांतर्फे त्याने गोल केले आहेत.

Sameer Panditrao

पणजी : एफसी गोवा संघासाठी गोल नोंदविण्यासाठीच स्पॅनिश आघाडीपटू हावियर सिव्हेरियो याला करारबद्ध केले असून तो अपेक्षापूर्ती नक्कीच करेल, असा विश्वास या संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी व्यक्त केला.

आगामी नव्या मोसमासाठी एफसी गोवाने २७ वर्षीय सिव्हेरियो याला करारबद्ध केले आहे. स्पेनमधील सांताक्रूझ द टेनिरिफे येथे जन्मलेला खेळाडू २०२१ पासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळत आहे.

या कालावधीत हैदराबाद एफसी, ईस्ट बंगाल, जमशेदपूर एफसी या संघांचे प्रतिनिधित्व करताना सिव्हेरियो याने एकत्रित ३१ गोल नोंदविले आहेत. तो संघात असताना हैदराबाद एफसीने आयएसएल करंडक, तर ईस्ट बंगालने २०२४ सुपर कपचे विजेतेपद मिळविले होते.

सिव्हेरियो याच्या उपयुक्ततेविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘हावियर हमखास गोल नोंदविणारा आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व संघांतर्फे त्याने गोल केले आहेत.

भारतात खेळण्याचा त्याच्यापाशी खूप अनुभव जमा आहे. यापूर्वी (स्पेनमधील) लास पाल्मास, तसेच हैदराबाद एफसी संघात असताना तो माझ्यासोबत होता, तेव्हा आम्ही विजेतेपद मिळविले. आता तो याच कामगिरीसाठी एफसी गोवा संघात आला आहे.

आयएसएलमध्ये चेंडूस उत्कृष्ट हेडिंग साधणाऱ्यांत तो सर्वोत्तम ठरतो. अप्रतिम संघभावना जपणारा हा खेळाडू या मोसमात संघासाठी निश्चितच खूपच उपयुक्त ठरेल.’ एफसी गोवा हा एक उत्कृष्ट संघ असल्याने त्यांच्याशी करार करण्याचा निर्णय घेणे आपल्यासाठी सोपे ठरल्याचे सिव्हेरियो याने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT