FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Durand Cup 2024: सलग दुसऱ्या विजयासह एफसी गोवा अव्वल!

FC Goa: शिलाँग येथे नेपाळच्या त्रिभुवन आर्मीला एफसी संघाने २-१ फरकाने नमविले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवा संघाने सलग दुसऱ्या विजयासह १३३व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘फ’ गटात अव्वल स्थान मिळविले. शिलाँग येथे गुरुवारी त्यांनी नेपाळच्या त्रिभुवन आर्मी एफसी संघाला २-१ फरकाने नमविले.

लाल्थांगलियाना याने सामन्याच्या पहिल्याच मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. ५०व्या मिनिटास सिटरॉय कार्व्हालो याच्या गोलमुळे एफसी गोवाची आघाडी मजबूत झाली, मात्र ६६व्या मिनिटास बसंत जिम्बा याच्या गोलमुळे नेपाळमधील संघाची पिछाडी एका गोलने कमी झाली.

अगोदरच्या लढतीत एफसी गोवाने रंगदाजिएद युनायटेडवर ४-३ फरकाने मात केली होती. त्रिभुवन आर्मी संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. इस्त्राईल गुरुंग यांच्या मार्गदर्शनाखालील नवोदित खेळाडू असलेल्या एफसी गोवा संघाचा गटसाखळी फेरीतील अखेरचा सामना १७ ऑगस्ट रोजी शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होईल. एफसी गोवास बाद फेरीसाठी त्या लढतीत बरोबरीचा एक गुण पुरेसा असेल. शिलाँग लाजाँगचे एका लढतीतून तीन गुण आहेत. त्यांनी त्रिभुवन आर्मीला एका गोलने हरविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT