Lara Sharma Football Player Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Lara Sharma: FC Goa चा गोलरक्षक 'लारा' पुनरागमनासाठी सज्ज! संयमाने केली दुखापतीवर मात

FC Goa Lara Sharma: अमृतसर-पंजाब येथील २५ वर्षीय गोलरक्षक लारा म्हणाला, की ‘‘मला घाई नाही. मी पुनरागमनासाठी सज्ज आहे.

Sameer Panditrao

पणजी: एफसी गोवाचा गोलरक्षक लारा शर्मा याच्यासाठी वर्षभराचा कालावधी खूपच खडतर ठरला. कारकिर्दीत प्रथमच झालेली गंभीर स्वरुपाची दुखापत, त्यानंतर तंदुरुस्ती गाठताना पुनर्वसन प्रक्रियेतील काळ आव्हानात्मक होता. प्रतिकुल परिस्थितीत संयम महत्त्वाचा ठरला, असे मत या २६ वर्षीय फुटबॉलपटूने शुक्रवारी व्यक्त केले.

अमृतसर-पंजाब येथील २५ वर्षीय गोलरक्षक लारा म्हणाला, की ‘‘मला घाई नाही. मी पुनरागमनासाठी सज्ज आहे. ते कधीही होऊ शकते, ते उद्या असेल किंवा महिनाभराने, मात्र मानसिकदृष्ट्या कणखर आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मला दुखापत झाली. फुटबॉल कारकिर्दीत मला प्रथमच अशा वाईट परिस्थितीतून जावे लागले.

सुरवातीचे तीन-चार महिने कठीण ठरले, या कालावधीत संयम महत्त्वाचा ठरला. तंदुरुस्त होऊन पुन्हा मैदानात उतरणे सोपे नव्हते. एफसी गोवाच्या सीनियर खेळाडूंकडून मिळालेली प्रेरणा फायदेशीर ठरली. प्रशिक्षक मानोलो यांचे प्रोत्साहन मौल्यवान ठरले. आता पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे.’’

टाटा अकादमी ते एफसी गोवा

गोलरक्षक लारा शर्मा याच्या फुटबॉल गुणवत्तेला जमशेदपूरस्थित टाटा फुटबॉल अकादमीत शास्त्रोक्त मार्गदर्शन लाभले. इंडियन ॲरोजकडून आय-लीग स्पर्धेत व्यावसायिक पदार्पण केल्यानंतर त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसीतर्फे पाच सामने खेळल्यानंतर तो २०२३-२४ मोसमात केरळा ब्लास्टर्स संघात रुजू झाला. या संघातर्फे खेळताना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. २०२४-२५ मोसमासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये लारा याला एफसी गोवाने करारबद्ध केले, मात्र तंदुरुस्तीच्या प्रक्रियेत असल्याने तो यंदा एकही सामना खेळू शकला नाही. ‘‘एकंदरीत फुटबॉलमधील माझी आतापर्यंतची वाटचाल आनंददायी असून अजून खूप मजल गाठायची आहे,’’ असे तो म्हणाला.

लारा शर्मा

‘‘पुनरागमनाच्या प्रक्रियेत असताना, तसेच प्रारंभीच्या सरावात दुखापत पुन्हा डोके वर काढेल हे भय मनात होते. त्यामुळे काही प्रमाणात साशंक होतो. संदेशभाईशी (झिंगन) पुष्कळ चर्चा केली. त्याने धीर दिला. आता मी खंबीर आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT