Manolo Marquez FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: 'आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार का, हे गोव्यात ठरेल, प्रशिक्षक मार्केझ यांचे प्रतिपादन, आता आव्हान बंगळूरचे

Manolo Marquez: मार्केझ म्हणाले, की साखळी फेरीच्या तुलनेत आता परिस्थिती पू्र्ण वेगळी आहे. उपांत्य फेरीत आमच्यासाठी दोन सामने आहेत.

Sameer Panditrao

पणजी: एफसी गोवाने अजून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील करंडक जिंकलेला नाही, ते अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी संघ इच्छुक आहे. आम्ही अंतिम फेरी गाठण्याबाबतचे भवितव्य गोव्यात (फातोर्डा येथे) होणाऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत ठरेल, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एफसी गोवा आणि बंगळूर एफसी यांच्यात दोन टप्प्यातील उपांत्य फेरी होणार आहे. पहिला सामना २ एप्रिल रोजी बंगळूर येथे, तर दुसरा सामना ६ एप्रिल रोजी फातोर्डा येथे खेळला जाईल. उपांत्य फेरीतील दुसरी लढत लीग शिल्ड विजेते मोहन बागान व जमशेदपूर एफसी यांच्यात होईल. साखळी फेरीतील अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकामुळे मोहन बागान व एफसी गोवा यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला, तर प्ले-ऑफ बाद फेरीत बंगळूरने मुंबई सिटीचा ५-० असा धुव्वा उडवत, तर जमशेदपूरने नॉर्थईस्ट युनायटेडला २-० फरकाने नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मार्केझ म्हणाले, की ‘साखळी फेरीच्या तुलनेत आता परिस्थिती पू्र्ण वेगळी आहे. उपांत्य फेरीत आमच्यासाठी दोन सामने आहेत. आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार का, हे गोव्यात ठरेल, बंगळूरमध्ये नाही.’ करंडक जिंकण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न असतील, असेही ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शकाने नमूद केले. एफसी गोवास बंगळूरमध्ये खेळताना विशेष सफलता मिळालेली नाही, चारपैकी तीन सामने बरोबरीत राहिले आहेत. ‘सामना नक्कीच कठीण असेल. आम्हाला उच्च एकाग्रतेसह खेळातील अधिकांश मिनिटे वर्चस्व राखावे लागेल. लढत दोन्ही संघांसाठी खडतर असेल. प्रतिस्पर्ध्यांकडून सुरुवातीपासूनच जोरदार प्रतिकार अपेक्षित आहे, त्यामुळे आम्हाला चांगली कामगिरी प्रदर्शित करावी लागेल,’ असे मार्केझ म्हणाले.

संघाची मानसिकता सकारात्मक

एफसी गोवाचा ३२ वर्षीय मध्यरक्षक आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू याने सांगितले, की ‘संघाची मानसिकता सकारात्मक आहे. शिल्ड हुकल्यानंतर आम्हाला करंडक जिंकायचा आहे. साखळी फेरीनंतर मोठी विश्रांती मिळाली. त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे. तयारीसाठीही वेळ मिळाला. आता सर्व लक्ष प्ले-ऑफ सामन्यावर केंद्रित असून आम्हाला कारणे द्यायची नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील सामना आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत आणि ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.’

दृष्टिक्षेपात...

२०२४-२५ आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा व बंगळूर एफसी यांच्यात २ लढती

२ नोव्हेंबर २०२४ रोजी फातोर्डा येथे एफसी गोवा ३-० फरकाने विजयी

१४ डिसेंबर २०२४ रोजी बंगळूर येथे ०-२ पीछाडीनंतर बंगळूर एफसीची २-२ बरोबरी

एकंदरीत १७ सामन्यांत बंगळूर एफसीचे ७, एफसी गोवाचे ५ विजय, ५ बरोबरी

एफसी गोवा आठव्यांदा स्पर्धेच्या प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीत

१७ मार्च २०१९ रोजी करंडकाच्या अंतिम लढतीच्या अतिरिक्त वेळेत एफसी गोवाविरुद्ध बंगळूर एफसीची १-० अशी बाजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT