Temba Bavuma  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA: रांची वनडेपूर्वी रोहित-विराटबाबत काय बोलला टेम्बा बावुमा? कर्णधाराचे चकीत करणारे वक्तव्य चर्चेत VIDEO

Temba Bavuma Statement: भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Manish Jadhav

Temba Bavuma Statement: भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता वनडे मालिकेतही ते त्यांच्या आक्रमक शैलीत खेळताना दिसतील. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला याबद्दल विचारले असता, त्याने दिलेले उत्तर आता क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.

रोहित-विराटबद्दल टेम्बा बावुमाचे मत

माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली हे दोघेही प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहेत. या दोघांच्या उपस्थितीमुळे भारतीय संघ खूपच मजबूत दिसत आहे. याबाबत टेम्बा बावुमाला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने आपले मत स्पष्टपणे मांडले. बावुमा म्हणाला, "मला वाटते की हे रोमांचक आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दोन दिग्गज खेळाडू परत येत आहेत."

"जेव्हा हे दोन मोठे खेळाडू मैदानावर असतात, तेव्हा त्या वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेचा भाग असणे आमच्यासाठी रोमांचक आहे," असे तो म्हणाले. बावुमाने स्पष्ट केले की, हे असे काहीतरी आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

तो पुढे म्हणाला, "मला वाटते की इतर कोणत्याही खेळाडूप्रमाणेच आम्ही त्यांच्यासाठीही आमची तयारी करु. आमच्याकडे जी काही रणनीती असेल, त्याचे आम्ही पालन करु. आम्हाला माहिती आहे की मैदानावरची ऊर्जा थोडी वेगळी असेल."

बावुमाच्या या वक्तव्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दिग्गजांचा सामना करण्यासाठी सज्ज असून त्यांच्या उपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या उत्साहाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार असूनही त्याने विराट आणि रोहितचे महत्त्व अप्रत्यक्षपणे मान्य केले.

स्वतःच्या कामगिरीवर बावुमा खूश

कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) कर्णधार म्हणून टेम्बा बावुमाची कामगिरी खूपच उत्कृष्ट राहिली. आता वनडे मालिकेतही त्याला हीच लय कायम राखायची आहे. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना बावुमा म्हणाला, "एक कर्णधार म्हणून मला वाटत नाही की आमच्या संघात जास्त काही बदल होईल."

"आम्ही ज्या प्रकारे कसोटी मालिकेत खेळलो, त्याच पद्धतीने वनडेतही खेळायला आम्हाला आवडेल," असा विश्वासही त्याने व्यक्त केला. बावुमाच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होते की, विराट आणि रोहितच्या पुनरागमनाचा आदर असला तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांची स्वतःची रणनीती आणि खेळातील लय कायम ठेवण्यावर भर देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

Arambol: '..अन्यथा सचिवालयावर धडक मोर्चा नेऊ'! हरमलवासीयांचा इशारा; जमीन रूपांतरणाविरिद्ध आवळली मूठ

Goa Politics: खरी कुजबुज; सुदिनराव-गोविंद गावडे एकत्र येणार?

Ponda By Election: "फोंड्यात आमचा रितेश नाईकनाच पाठिंबा"! ढवळीकरांची ठाम भूमिका; भाटीकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत केले मोठे विधान

Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

SCROLL FOR NEXT