Dempo SC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Professional League: उत्कंठावर्धक सामन्यात धेंपो क्लबने मारली बाजी, एफसी गोवाविरुद्ध नोंदवला विजय; बदली खेळाडूने साधली किमया

Dempo SC Defeats FC Goa: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने उत्कंठावर्धक लढतीत एफसी गोवावर १-० फरकाने मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने उत्कंठावर्धक लढतीत एफसी गोवावर १-० फरकाने मात केली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बदली खेळाडू श्रेयश नाईक याने भरपाई वेळेत (९०+४ मिनिट) केलेला गोल धेंपो क्लबसाठी पूर्ण तीन गुण मिळवून देण्यास पुरेसा ठरला.

वास्को येथील टिळक मैदानावर स्पर्धेतील अन्य एका लढतीत कुठ्ठाळी व्हिलेजर्सला पणजी फुटबॉलर्सने २-२ असे गोलबरोबरीत रोखले. कुठ्ठाळी व्हिलेजर्ससाठी पुष्कर प्रभू याने ४३व्या, तर जैसन वाझ याने ७५व्या मिनिटास गोल केला. पणजी (Panaji) फुटबॉलर्सला एस्प्रितो त्रावासोच्या स्वयंगोलचा ४५+२ व्या मिनिटास लाभ झाल्यानंतर ५९व्या मिनिटास पी. बी. बेनविन याने गोल केला.

धेंपो, सेझा अकादमी अंतिम फेरीत

ड्रीम स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लब व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात गोवा विभागीय अंतिम लढत होणार आहे. उपांत्य फेरीती सामने गिरी येथील मैदानावर बुधवारी झाले. धेंपो क्लबने बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमीस १-० फरकाने हरविले. जोनाथन सिल्वा याने ७६व्या मिनिटास निर्णायक गोल केला. सेझा अकादमीने एफसी गोवास (FC Goa) १-० फरकाने नमविले. ख्रिस वेडो याने ४८व्या मिनिटास गोल केला. अंतिम सामना १४ फेब्रुवारीस खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT