Dempo Club Vs Shillong Lajong FC X
गोंयचें खेळामळ

I League 2024: 9 वर्षांनी धेंपो क्लब भिडणार शिलाँग लाजाँगशी; आज रंगणार थरार, ॲरिस्टनमुळे वाढली ताकत

Dempo Club Vs Shillong Lajong FC: आय-लीग स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळल्यानंतर आता धेंपो, तसेच शिलाँग लाजाँग संघाचा प्रत्येकी एक गुण आहे. धेंपो क्लबने गतआठवड्यात ऐजॉल येथे ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया साधली.

गोमन्तक डिजिटल टीम

Dempo Club Vs Shillong Lajong FC I League 2024

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत नऊ वर्षांनंतर पुनरागमन करताना मागील लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबने बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. माजी विजेत्यांचा पुढील सामना शनिवारी (ता. ३०) मेघालयातील शिलाँग येथे यजमान शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होईल.

आय-लीग स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळल्यानंतर आता धेंपो, तसेच शिलाँग लाजाँग संघाचा प्रत्येकी एक गुण आहे. धेंपो क्लबने गतआठवड्यात ऐजॉल येथे ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया साधली. स्पर्धेतील गोव्याचा आणखी एक संघ चर्चिल ब्रदर्सविरुद्ध दोन गोलच्या पिछाडीवरून शिलाँग लाजाँग एफसीने जबरदस्त मुसंडी मारत घरच्या मैदानावर २-२ गोलबरोबरीसह एका गुणाची कमाई केली होती.

सामन्याच्या पूर्वसंध्येला धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले, की ‘‘पहिल्या सामन्यात आम्ही छान खेळ केला. खेळाडूंनी भक्कम खेळाचे शानदार प्रदर्शन घडविले. ऐजॉलच्या तुलनेत शिलाँगमधील हवामान जास्त थंड आहे.

फुटबॉल खेळण्यास ते उपयुक्त आहे. आमची तयारी चोख असून आव्हानासाठी आम्ही सज्ज आहोत.’’ मध्यरक्षक ॲरिस्टन कॉस्ता संघात परतल्यामुळे आक्रमणातील धेंपो क्लबची ताकद वाढली आहे. अर्जेंटिनाचा खेळाडू दामियन पेरेझ याची परदेशी खेळाडू नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो निवडीसाठी उपलब्ध आहे.

आमने-सामने

धेंपो क्लब व शिलाँग लाजाँग यांच्यात आय-लीग स्पर्धेत २०१५ नंतर प्रथमच सामना होत आहे. २ मे २०१५ रोजी घरच्या मैदानावर शिलाँग लाजाँगने धेंपो क्लबला ३-० फरकाने नमविले होते. एकंदरीत उभय संघांत आय-लीग स्पर्धेत आठ लढती झाल्या आहेत. शिलाँग लाजाँगने चार, तर धेंपो क्लबने तीन सामने जिंकले असून एक लढत बरोबरीत राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT