Goa Cricket Dainik
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: घरच्या मैदानावरही गोवा पराभूत! यश, अनुजची झुंज निष्फळ; छत्तीसगड 260 धावांनी विजयी

Goa Vs Chhattisgarh:कर्णधार यश कसवणकर व अनुज यादव यांनी झुंझार अर्धशतके नोंदविताना कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cooch Behar U19 Trophy 2024 Chhattisgarh Vs Goa

पणजी: कर्णधार यश कसवणकर व अनुज यादव यांनी झुंझार अर्धशतके नोंदविताना कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरले. छत्तीसगडने क गट सामना २६० धावांनी जिंकून सहा गुणांची कमाई केली.

सांगे येथील जीसीए मैदानावर चार दिवसीय सामना झाला. अगोदरच्या लढतीत तमिळनाडू व हरियानाविरुद्ध अवे मैदानावर पराभूत झालेल्या गोव्याला घरच्या मैदानावरही हार स्वीकारावी लागली. चार लढतीनंतर त्यांच्या खाती फक्त एक गुण आहे. सहा संघांच्या या गटात गोव्याचा शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांचा अखेरचा साखळी सामना सहा डिसेंबरपासून पर्वरी येथे पंजाबविरुद्ध होईल. छत्तीसगडने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवत एकूण गुणसंख्या १२ वर नेली. गटात ते आता तिसऱ्या स्थानी आहे.

गोव्यासमोर ५०३ धावांची खूपच कठीण आव्हान होते. तिसऱ्या दिवसअखेरच्या ३ बाद ५८ वरून त्यांनी रविवारी दुसऱ्या डावात पुढे खेळण्यास सुरवात केली. त्यांचा डाव चहापानानंतर २४२ धावांत संपुष्टात आला. दिशांक मिस्कीन (३३) व यश कसवणकर (८५) यांनी चिवट फलंदाजी करत किमान अनिर्णित निकालासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली असता दिशांकला कृष्णा टौंक याने त्रिफळाचीत बाद केले.

तीन धावांत आणखी दोन विकेट गमावल्यामुळे गोव्याचा संघ ६ बाद १४२ असा संकटात सापडला. शतकाला १५ धावा हव्या असताना यश याला बदली यष्टीरक्षक दक्ष कुमार याने फैझच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केल्यानंतर गोव्याला मोठा धक्का बसला. कसवणकर याने २०४ चेंडूंतील खेळीत सात चौकार व दोन षटकार मारले. अनुज यादव (नाबाद ६२, १६५ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) याने ६१ चेंडूंत सहा धावा केलेल्या समर्थ राणे याच्यासमवेत गोव्याचा पराभव टाळण्यासाठी मेहनत घेतली, पण ती पुरेशी ठरली नाही. त्यांनी आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड, पहिला डाव ः २२१ व दुसरा डाव ः ६ बाद ४२३ घोषित.

गोवा, पहिला डाव ः १४२ व दुसरा डाव (३ बाद ५८ वरून) ः १२०.४ षटकांत सर्वबाद २४२ (दिशांक मिस्कीन ३३, यश कसवणकर ८५, जीवनकुमार चित्तेम ०, शमिक कामत १, अनुज यादव नाबाद ६२, समर्थ राणे ६, निश्चय नाईक १, नील नेत्रावळकर ०, धनंजय नायक २-४४, महंमद फैझ खान २-३६, विकल्प तिवारी ३-३२, कृष्णा टौंक ३-४३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT