Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: ऑल आऊट 125 नंतर, 3 बाद 54; गोव्याला मोठ्या आघाडीसह विजयाची चाहूल, उत्तर प्रदेशचा संघ पिछाडीवर

Uttar Pradesh vs Goa: एलिट ड गट चार दिवसीय सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे. गोव्याने कालच्या ३ बाद १४२ धावांवरून मंगळवारी चहापानानंतर सर्वबाद २८९ धावा केल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याला कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयाची चाहूल लागली. यजमान संघाने पहिल्या डावात १६४ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात मंगळवारी दिवसअखेर ३ बाद ५४ अशी घसरण झाली असून ते ११० धावांनी पिछाडीवर आहेत.

एलिट ड गट चार दिवसीय सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे. गोव्याने कालच्या ३ बाद १४२ धावांवरून मंगळवारी चहापानानंतर सर्वबाद २८९ धावा केल्या. १६ वर्षीय साई नाईक याची अर्धशतकी खेळी गोव्याच्या पहिल्या डावात लक्षवेधी ठली. उत्तर प्रदेशचा पहिला डाव १२५ धावांत आटोपला होता.

सोमवारी पहिल्या दिवसअखेर नाबाद असलेला अर्धशतकवीर कर्णधार यश कसवणकर (६१) मंगळवारी सकाळच्या सत्रात लगेच बाद झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज साई नाईक याची झुंझार फलंदाजी गोव्यासाठी मौल्यवान ठरली. त्यामुळे यजमानांची आघाडी वाढली.

अर्धशतक नोंदविताना साई याने १३८ चेंडूंत आठ चौकारांसह ६५ धावा केल्या. त्याने दिशांक मिस्कीन (२५) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी केलेली ८१ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली, कारण गोव्याने नंतर अखेरच्या पाच विकेट ४५ धावांत गमावल्या.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव : १२५

गोवा, पहिला डाव (३ बाद १४२ वरुन) : १०२.५ षटकांत सर्वबाद २८९ (यश कसवणकर ६१, मिहीर कुडाळकर ६, दिशांक मिस्कीन २५, साई नाईक ६५, चिगुरुपती व्यंकट २८, शिवेन बोरकर ७, समर्थ राणे ०, पियुष देविदास नाबाद ०, यश पनवर ३-६३, आयन अक्रम ३-५७).

उत्तर प्रदेश, दुसरा डाव : २२ षटकांत ३ बाद ५४ (भावी गोयल नाबाद १५, समर्थ राणे ५-२-११-०, चिगुरुपती व्यंकट ५-१-१०-२, यश कसवणकर ६-२-२३-१, मिहीर कुडाळकर ५-१-८-०, शिवेन बोरकर १-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

Goa Live News: 'गोंयच्या सायबा'च्या दर्शनासाठी जुने गोव्यात भक्तांचा महासागर; Watch Video

Goa Crime: 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण! सहाजणांविरोधात गुन्हा, दोघा संशयितांना सशर्त जामीन

St Xavier Feast: ओढ ‘गोंयच्या सायबा’च्या दर्शनाची! महाराष्ट्रातील 200 भाविक पायीवारी करत गोव्यात, 40हून अधिक वर्षांपासूनचा उपक्रम

Syed Mushtaq Ali Trophy 2025: गोव्याने घेतला बदला! मध्य प्रदेशला नमविले; सुयश, अभिनवची अर्धशतके; तेंडुलकरला 3 बळी

SCROLL FOR NEXT