Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: गोव्याचा निराशाजनक शेवट! मध्य प्रदेशविरुद्ध 3 दिवसांतच पराभूत; चांगल्या सुरुवातीनंतर कामगिरी घसरली

Goa Cricket U19 Team: कोटार्ली-सांगे येथे झालेल्या बाद फेरी लढतीत मध्य प्रदेशने गोव्याला तीन दिवसांतच पराभूत केले. गोव्याच्या संघाला पहिल्या डावात १६४, तर दुसऱ्या डावात १२१ धावाच करता आल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

MP vs Goa Cricket Match : कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या आरंभी एलिट गटात गोव्याच्या संघाकडून फार मोठ्या आशा नव्हत्या, पण त्यांनी मोहिमेस धडाक्यात सुरवात केल्यामुळे अपेक्षा उंचावल्या, पण संघाला नंतर लौकिक राखता आला नाही. उपांत्यपूर्व फेरी गाठलेला संघ महत्त्वाच्या सामन्यात साफ निष्प्रभ ठरला, परिणामी मोहिमेचा समारोप निराशाजनक ठरला.

गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) संघाकडून कुचबिहार करंडक जिंकण्याची फार मोठी अपेक्षा बाळगली होती. विजेतेपद मिळविल्यास आगावूच २५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. संघाने साखळी फेरीतील अखेरच्या दोन लढती आणि उपांत्यपूर्व लढतीत निराशाजनक खेळ केला.

कोटार्ली-सांगे येथे झालेल्या बाद फेरी लढतीत मध्य प्रदेशने गोव्याला तीन दिवसांतच पराभूत केले. गोव्याच्या संघाला पहिल्या डावात १६४, तर दुसऱ्या डावात १२१ धावाच करता आल्या. याच खेळपट्टीवर मध्य प्रदेशने ५ बाद ४२ धावांवरून ३९० धावांची मजल मारताना गोव्याला डाव व १०५ धावांनी पराभूत केले.

अष्टपैलू व्यंकट आश्वासक

१९ वर्षांखालील वयोगटातील यावेळच्या कुचबिहार करंडक स्पर्धेत चिगुरुपती व्यंकट याची अष्टपैलू चमक आश्वासक ठरली. त्याने मध्यमगती गोलंदाजीने सहा सामन्यांत २६ गडी बाद करताना दोन वेळा डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. शिवाय त्याने फलंदाजीत २२४ धावाही केल्या.

तीन विजयानंतर कामगिरी घसरली

गोव्याने एलिट ड गटात सुरवातीचे तिन्ही सामने दणक्यात जिंकले. भिलाई येथे छत्तीसगडला डाव व १३ धावांनी, पणजी जिमखान्यावर आसामला डाव व २१५ धावांनी, तर सांगे येथे उत्तर प्रदेशला सात विकेट राखून हरविले. नंतर अचानक गोव्याची कामगिरी घसरली. कल्याणी येथे बंगालविरुद्ध अनिर्णित लढतीत गोव्याने आघाडीचे तीन गुण मिळविले, या निकालाचे सारे श्रेय तळाच्या चिरुगुपती व्यंकट याला जाते. त्याने झुंझार ९७ धावांची खेळी केल्यामुळेच बंगालची पकड निसटली. पर्वरी येथे झालेल्या गटसाखळीतील अखेरच्या लढतीत गोव्याला चंडीगडवर वर्चस्व राखता आले नाही. अनिर्णित लढतीत फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले.

फक्त एकच शतक

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा गोव्यातर्फे फक्त एकच शतक नोंदीत झाले. कर्णधार यश कसवणकर याने छत्तीसगडविरुद्ध नाबाद २४३ धावांची मॅरेथॉन खेळी केली. यश याने सहा सामन्यांत एकूण ५२६ धावा केल्या. हा एकमेव अपवाद. गोव्याच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक संयम प्रदर्शित करता आला नाही. या कारणास्तव घरच्या मैदानावर उपांत्यपूर्व लढत खेळूनही गोव्याला फलंदाजीत अपयशाला सामोरे जावे लागले हे कामगिरीवरून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT