Nisarga Nagvekar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: शतकवीर 'निसर्ग', शमिकची झुंझार फलंदाजी गोव्यासाठी ठरली निर्णायक; हैदराबादविरुद्ध टळला फॉलोऑनचा धोका

Goa Vs Hyderabad: हैदराबाद जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात यजमानांच्या पहिल्या डावातील 9 बाद 604 धावसंख्येला उत्तर देताना गोव्याने लढतीच्या शेवटच्या दिवशी सर्वबाद 482 धावा केल्या.

Manish Jadhav

पणजी: निसर्ग नागवेकर याचे झुंझार शतक, शमिक कामतचे अर्धशतक गोव्यासाठी शनिवारी निर्णायक ठरले. त्यामुळे फॉलोऑनचा धोका टाळत हैदराबादविरुद्धचा कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामना अनिर्णित राखणे शक्य झाले.

दरम्यान, हैदराबाद जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात यजमानांच्या पहिल्या डावातील 9 बाद 604 धावसंख्येला उत्तर देताना गोव्याने लढतीच्या शेवटच्या दिवशी सर्वबाद 482 धावा केल्या. हैदराबादला पहिल्या डावात 122 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी अनिर्णित लढतीतून तीन गुण प्राप्त केले, तर गोव्याला एक गुण मिळाला.

औपचारिक ठरलेल्या दुसऱ्या डावात अनिर्णित लढतीस सहमती मिळाली तेव्हा हैदराबादने 1 बाद 133 धावा केल्या. पहिल्या डावात 219 धावा केलेल्या सलामीच्या ॲरन जॉर्ज याने दुसऱ्या डावातही आक्रमक शतक ठोकले. त्याने 64 चेंडूंत 17 चौकार व दोन षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या.

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवसअखेरच्या 5 बाद 351 धावांवरुन निसर्ग व शमिक यांनी शनिवारी सकाळी टिच्चून फलंदाजी केली. त्यांच्या जिगरबाज खेळीमुळे गोव्याने फॉलोऑनची नामुष्की टाळत हैदराबादला पुन्हा फलंदाजीला उतरण्यास भाग पाडले. निसर्ग व शमिकने सहाव्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी करुन संघाला चारशे धावांचा टप्पा पार करुन दिला.

वैयक्तिक 66 धावांवर शमिक बाद झाला. त्याने164 चेंडूंतील खेळीत 11 चौकार मारले. नंतर निसर्गने समर्थ राणे (17) याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करून गोव्याला पावणेपाचशे धावांचा पल्ला गाठून दिला. निसर्ग नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्याने 359 चेंडूंतील मॅरेथॉन खेळीत 19 चौकार व 2 षटकारांसह 134 धावा केल्या.गोव्याचा एलिट क गटातील पुढील सामना 13 नोव्हेंबरपासून तमिळनाडूविरुद्ध थेनी येथे खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद, पहिला डाव: 9 बाद 604 घोषित.

गोवा, पहिला डाव (5 बाद 351 वरून): 179.1 षटकांत सर्वबाद 482 (निसर्ग नागवेकर 134, शमिक कामत 66, पुंडलिक नाईक 2, अनुज यादव 9, समर्थ राणे 17, मिहीर कुडाळकर नाबाद 4, मलिक 2-76, बी. सचित 2-78, वाय. यशवीर 4-91).

हैदराबाद, दुसरा डाव: 21 षटकांत 1 बाद 133 (ॲरन जॉर्ज नाबाद 103, सिद्धार्थ राव चेप्याला नाबाद 21, शमिक कामत 5-2-20-0, अनुज यादव 10-0-74-1, पुंडलिक नाईक 2-0-15-0, यश कसवणकर 4-0-24-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT