Yash Kasvankar double century Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Yash Kasvankar Double Century: 20 चौकार, 5 षटकार! गोव्याच्या कर्णधाराची तुफानी द्विशतकी खेळी; छत्तीसगडविरुद्ध 219 धावांची आघाडी

Goa vs Chhattisgarh Cooch Behar: छत्तीसगडमधील भिलाई येथे एलिट ब गट सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर कसवणकर २४३ धावांवर खेळत होता.

Sameer Panditrao

पणजी: कर्णधार यश कसवणकर याने कारकिर्दीतील सर्वांगसुंदर खेळी करताना सोमवारी नाबाद द्विशतक झळकावले. त्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला छत्तीसगडवर २१९ धावांची भक्कम आघाडी घेणे शक्य झाले.

छत्तीसगडमधील भिलाई येथे एलिट ब गट सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर कसवणकर २४३ धावांवर खेळत होता. या भक्कम फलंदाजीमुळे गोव्याने खेळ थांबला तेव्हा ९ बाद ३८९ धावा केल्या. छत्तीसगडने पहिल्या डावात १७० धावांची मजल गाठली होती.

यश कसवणकर याने मॅरेथॉन खेळीत ३२२ चेंडूंचा सामना करताना २० चौकार व पाच उत्तुंग षटकार मारले. त्याच्या द्विशतकी खेळीतील वैशिष्ट्य म्हणजे, तळाच्या फलंदाजांना साथीला घेत त्याने संघाची स्थिती मजबूत केली आणि वैयक्तिक टप्पाही गाठला.

कालच्या ४ बाद ८७ धावांवरुन पुढे खेळताना यश व मिहीर कुडाळकर यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली, पण मिहीर (२८) याच्यासह तीन विकेट फक्त तीन धावांत गमावल्यामुळे गोव्याची ७ बाद १६० धावा अशी घसरगुंडी उडाली.

प्रतिकुल परिस्थितीत गोव्याच्या कर्णधाराने चिगुरुपती व्यंकट (४०) याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करून गोव्याला सव्वादोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. नंतर यश याने दहाव्या क्रमांकावरील फलंदाज शिवेन बोरकर (२०) याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याने साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर समर्थ राणे यश याला साथ देत होता.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड, पहिला डाव ः १७०

गोवा, पहिला डाव (४ बाद ८७ वरुन) ः ११८ षटकांत ९ बाद ३८९ (यश कसवणकर नाबाद २४३, मिहीर कुडाळकर २८, आराध्य गोयल ०, साई नाईक ०, चिगुरुपती व्यंकट ४०, शिवेन बोरकर २०, समर्थ राणे नाबाद ०, रुद्रप्रताप देहारी ३-५८, महंमद फैझ खान २-५१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावळ-शेट्येंची 'सेमीफायनल', दोघांनीही थोपटले दंड; डिचोलीतील लाटंबार्सेत प्रचार 'तापला'

Konkan Railway: कोकण रेल्वेचा फुकट्यांना दणका; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 17.83 कोटी दंड वसूल

Goa Crime: अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई येथे अत्‍याचार, संशयित पसार; पोलिसांकडून शोध सुरू

Canacona: विद्यार्थिप्रिय शिक्षिकेची बदली रद्द, मुलांचा हट्ट पूर्ण; पालकांच्‍या आंदोलनाला यश

Goa Theft: नवेवाडेतील चॅपेलमध्ये चोरी, संशयित अटकेत; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT