Cooch Behar Trophy:  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Cooch Behar Trophy 2025: कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेची अगोदरच बाद फेरी निश्चित झालेला गोव्याचा १९ वर्षांखालील युवा संघ अखेरच्या साखळी सामन्यात सुस्तावला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेची अगोदरच बाद फेरी निश्चित झालेला गोव्याचा १९ वर्षांखालील युवा संघ अखेरच्या साखळी सामन्यात सुस्तावला, त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी चंडीगडला पहिल्या डावातील आघाडीच्या दिशेने कूच करता आली. पाहुण्या संघाचा सलामीवीर अभिमन्यू (१२०) याने प्रेक्षणीय नाबाद शतक झळकावले.

पर्वरी येथील सुरू असलेल्या एलिट ड गट सामन्यात गोव्याचा पहिला डाव ७ बाद २७८ वरून ३०८ धावांत संपला. गोव्याच्या अखेरच्या सहा विकेटने धावसंख्येत फक्त ५१ धावांची भर टाकली. त्यामुळे फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर यजमान संघाला धावसंख्या वाढविणे शक्य झाले नाही.

सलामीचा अभिमन्यू याच्या नाबाद शतकामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर बुधवारी चंडीगडने ४ बाद २७० धावा केल्या. ते अजून ३८ धावांनी मागे आहेत. या लढतीच्या निकालाचा गोव्याच्या बाद फेरी वाटचालीवर परिणाम होणार नसला, तरी प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखण्यात यजमान संघ कमी पडला.

या लढतीत नवोदितांना संधी या धोरणांतर्गत दोघा खेळाडूंना अकरा सदस्यीय संघात सामावून घेण्यात आले, पण हे खेळाडू छाप पाडू शकते नाहीत. विशेषतः गोलंदाजीत गोव्याला फिरकीवर जास्त अवलंबून राहावे लागले. बुधवारी सकाळी चंडीगडच्या युवराज सिंग (४-४८) याने सुरेख स्विंग मारा केला, मात्र गोव्याच्या संघात दर्जेदार वेगवान गोलंदाजीचा अभाव जाणवला.

अभिमन्यू याने ऋत्विक सूद (३७) याच्यासमवेत चंडीगडला ६४ धावांची दमदार सलामी दिली, तर मागील तीन डावात दोन शतके व एक अर्धशतक केलेल्या मार्कंडे पांचाल (३३) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे चंडीगडच्या पहिल्या डावाचा पाया भक्कम झाला. दिवसअखेर नाबाद असलेल्या अभिमन्यू याने १२० धावांच्या खेळीत २४४ चेंडूंचा सामना करताना १० चौकार लगावले. आदित्य गुसैन (३२) याच्यासमवेत त्याने पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (७ बाद २७८ वरून) ः ९८.३ षटकांत सर्वबाद ३०८ (चिगुरुपती व्यंकट २३, मिहीर कुडाळकर ८, शिवेन बोरकर ४, सात्विक नाईक नाबाद ३, युवराज सिंग ४-४८, अंकन लटका ३-५०).

चंडीगड, पहिला डाव ः ८० षटकांत ४ बाद २७० (अभिमन्यू नाबाद १२०, ऋत्विक सूद ३७, मार्कंडे पांचाल ३३, मीत दहिया १९, एहित सलारिया १७, आदित्य गुसैन नाबाद ३२, चिगुरुपती व्यंकट १२-१-४५-०, सात्विक नाईक ४-१-१२-०, यश कसवणकर २१-१-९०-१, मिहीर कुडाळकर १७-१-४९-२, शिवेन बोरकर २६-३-६४-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT