Cooch Behar Trophy Goa Vs Punjab Cricket Match
पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात पंजाबने पहिल्या डावात ३६० धावांची आघाडी घेतल्यानंतर पर्वरी येथील जीसीए क्रिकेट अकादमी मैदानावर सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर शनिवारी गोव्याचा दुसरा डाव ५ बाद ७४ असा गडगडला. अजूनही ते २८६ धावांनी मागे असून डावाने पराभव निश्चित आहे.
पंजाबच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांना साफ निष्प्रभ केले. देव अमृतपाल सिंग (२००, २२८ चेंडू, २४ चौकार, ४ षटकार) याचे नाबाद द्विशतक, तसेच राहुल कुमार (११७, ८४ चेंडू, १० चौकार, ९ षटकार) याचे आक्रमक शतक यामुळे पंजाबने पहिला डाव ५ बाद ४७० धावांवर घोषित केला. त्यांच्या रेवनप्रीत सिंग (७७, ९३ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) यानेही अर्धशतक केले.
गोवा, पहिला डाव ः ११० व दुसरा डाव ः ३९ षटकांत ५ बाद ७४ (शंतनू नेवगी १२, विराज नाईक १२, चिगुरुपती व्यंकट ६, दिशांक मिस्कीन १२, यश कसवणकर नाबाद २६, निसर्ग नागवेकर ४, द्रिश नार्वेकर नाबाद ०, शुभम राणा २-२०).
पंजाब, पहिला डाव (३ बाद १३९ वरून) ः ८२.२ षटकांत ५ बाद ४७० घोषित (देव अमृतपाल सिंग नाबाद २००, राहुल कुमार ११७, रेवनप्रीत सिंग ७७, प्रभजीत सिंग नाबाद २९, पुंडलिक नाईक १६-२-७४-१, ग्रंथिक बुयाव १७-०-७५-२, यश कसवणकर २२-०-१२८-१, अनुज यादव १५-०-७७-१, द्विज पालयेकर ९.२-०-६२-०, दिशांक मिस्कीन ३-०-४२-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.