Laxmikant Kattimani Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोव्याच्या अनुभवी गोलरक्षकाचे 'कमबॅक'; लक्ष्मीकांत कट्टीमणीशी एका वर्षाचा करार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अनुभवी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याने तब्बल पाच वर्षांनंतर एफसी गोवा संघात पुनरागमन केले. या ३५ वर्षीय गोलरक्षकाशी एका वर्षाचा करार करण्यात आला.

अर्शदीप सिंग, लारा शर्मा व बॉब जॅक्सन यांच्यासह लक्ष्मीकांत एफसी गोवा संघातील २०२४-२५ मोसमासाठी चौथा गोलरक्षक आहे. गोमंतकीय गोलरक्षक २०१९ साली हैदराबाद संघात दाखल झाला होता, त्यापूर्वी तो एफसी गोवा संघाचा नियमित सदस्य होता.

या संघाचे आताचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने २०२१-२२ मोसमात आयएसएल करंडक पटकावला होता, तेव्हा लक्ष्मीकांतची कामगिरी निर्णायक ठरली होती. अंतिम लढतीत त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन फटके शिताफीने अडविले होते.

``एफसी गोवा संघात पुन्हा दाखल होणे माझ्यासाठी घरवापसी आहे. उत्कट चाहते आणि दृढ फुटबॉल संस्कृतीमुळे हा क्लब माझ्यासाठी नेहमीच खास आहे. प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्याशी पुन्हा जोडण्याकडे मी उत्सुकतेने पाहत आहे. त्यांच्यासमवेत हैदराबाद एफसी संघात मिळविलेले यश मी जतन केले आहे. त्यांचे तत्वज्ञान आणि सामन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन माझ्यासाठी प्रतिध्वनित आहे. एफसी गोवा संघाला मोठा बहुमान मिळवून देण्यासाठी योगदान देण्याचे मी लक्ष्य बाळगले आहे,`` असे लक्ष्मीकांत याने एफसी गोवाशी पुन्हा करार केल्यानंतर सांगितले.

एफसी संघात लक्ष्मीकांतचे स्वागत करताना मुख्य प्रशिक्षक मार्केझ यांनी सांगितले, की ``मैदानावरील कौशल्याव्यतिरिक्त तो एक सच्चा व्यावसायिक आहे, जो संघातील तरुण गोलरक्षकांसाठी मार्गदर्शक ठरताना त्यांच्यासमवेत काम करून उत्कृष्ट उदाहरण प्रदर्शित करतो.``

दृष्टिक्षेपात कारकीर्द

वास्को क्लबतर्फे २००८-०९ मध्ये आय-लीग पदार्पण

२००९-१० पासून धेंपो स्पोर्टस क्लबचा सदस्य

२००९-१० व २०११-१२ मध्ये आय-लीग विजेत्या धेंपो क्लबचा खेळाडू

२०१४ पासून आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व, मध्यंतरी अल्पकाळ मुंबई सिटीत लोनवर करारबद्ध

२०१९ मध्ये हैदराबाद एफसी संघाशी करारबद्ध

२०२१-२२ मध्ये हैदरबादतर्फे आयएसएल करंडक विजेता

क्लब पातळीवर १७५ सामने, ५५ लढतीत क्लीन शीट्स

२००९ मध्ये सॅफ करंडक विजेत्या भारताच्या २३ वर्षांखालील संघात समावेश

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT