Goa Cricket Team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: नायडू करंडकाचा बिगुल! पहिल्या दोन सामन्यांसाठी गोव्याचा संघ जाहीर, 'या' फलंदाजाकडे नेतृत्वाची धुरा

C K Nayudu U 23 Trophy 2024: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील (युवक) क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने संघ जाहीर केला आहे. युवक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कौशल हट्टंगडी.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu Under 23 Cricket Trophy 2024

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील (युवक) क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने संघ जाहीर केला आहे. अनुक्रमे छत्तीसगड व नागालँडविरुद्धच्या लढतीसाठी निवडलेल्या संघाचे कर्णधारपद फलंदाज कौशल हट्टंगडी याच्याकडे सोपविण्यात आले.

स्पर्धेत गोव्याचा एलिट ‘ब’ गटात समावेश आहे. पहिला सामना छत्तीसगडविरुद्ध सांगे येथील जीसीए मैदानावर १३ ऑक्टोबरपासून खेळला जाईल. दुसरा सामना नागालँडविरुद्ध २० ऑक्टोबरपासून सोविमा येथे खेळला जाईल.

त्यानंतर दिल्लीविरुद्ध पर्वरी येथे २७ ऑक्टोबरपासून, सौराष्ट्रविरुद्ध राजकोट येथे ८ नोव्हेंबरपासून, तर १५ नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशविरुद्ध अवे मैदानावर सामना होईल. अखेरचे दोन सामने जानेवारी-फेब्रुवारीत होतील. जम्मू-काश्मीरविरुद्धची लढत २५ जानेवारीपासून सांगे येथे, तर गुजरातविरुद्धची लढत १ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे खेळली जाईल.

गोव्याचा संघ

अझान थोटा (उपकर्णधार), देवनकुमार चित्तेम, कौशल हट्टंगडी (कर्णधार), आयुष वेर्लेकर, आर्यन नार्वेकर, शिवेंद्र भुजबळ (यष्टिरक्षक), सनथ नेवगी, इझान शेख (यष्टिरक्षक), शदाब खान, अभिनंदन ठाकूर, रुद्रेश शर्मा, लकमेश पावणे, मयूर कानडे, विनायक कुंटे, शिवम प्रताप सिंग, मिहीर गावडे, रतीश ताटे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT