Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25

पणजी: मोहम्मेडन स्पोर्टिंगला भरपाई वेळेतील गोलमुळे बरोबरीत रोखून एफसी गोवाने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील एका गुणाची कमाई केली, पण मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ अजूनही सांघिक कामगिरीवर नाराज आहेत.

एफसी गोवाची मानसिकता कमजोर असल्याचे मार्केझ यांनी शनिवारी रात्री सामना संपल्यानंतर सांगितले. ते म्हणाले, ``सध्या आमची स्थिती विशेषतः मानसिकदृष्ट्या चांगली नाही. शारीरिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या आम्ही आमच्या खेळाडूंना चांगले जाणतो, पण संघ थकल्यागत वाटत आहे. काही वेळा नेमके काय करावे हेच आम्हाला समजत नाही. त्याचे स्पष्टीकरण देणे कठीणच आहे. दमदार मोसमपूर्व तयारी, तसेच जमशेदपूर एफसीविरुद्ध पहिल्या अर्धात वर्चस्व राखूनही संघाने त्यांना उत्तरार्धात गोल करून सामना फिरविण्याची संधी दिली.``

स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी प्रशिक्षक या नात्याने मार्केझ यांनीही स्वीकारली आहे. त्यांनी संघात काही बदलांची गरज प्रतिपादली. ते म्हणाले, ``हे कदाचित योग्य दृष्टीकोनाच्या अभावामुळे घडत असावे किंवा संघाची निवड, तसेच बदली खेळाडूंच्या बाबतीत मी चूकत असावा.

परंतु त्याबद्दल कोणा एकाला दोषी ठरविता येणार नाही. आश्वासक बाब म्हणजे, भरपाई वेळेत आम्ही गुण प्राप्त केला, ज्यासाठी आम्ही पूर्णतः लायक होतो का याबाबत मी साशंक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT