I League Churchill Brothers Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्स विजयी घोषित, पण करंडकाच्या प्रतिक्षेत; ‘इंटर काशी’च्या भूमिकेकडेही लक्ष

I League Churchill Brothers: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स एफसीला २०२४-२५ मधील आय-लीग विजेते घोषित करण्यात आले.

Sameer Panditrao

पणजी: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर शनिवारी गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स एफसीला २०२४-२५ मधील आय-लीग विजेते घोषित करण्यात आले. आता विजेत्या संघाला अधिकृत करंडक प्राप्त होण्याची प्रतीक्षा असेल, त्याचवेळी द्वितीय क्रमांकावरील इंटर काशी संघाच्या भूमिकेकडेही लक्ष राहील.

आय-लीग विजेते घोषित केलेल्या चर्चिल ब्रदर्सचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) अभिनंदन केले आहे. जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले आहे, की ‘‘गोवा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने चर्चिल ब्रदर्स एफसीचे व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि खेळाडूंना २०२४-२५ मोसमातील आय-लीग विजेतेपदाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’’

२०२२ मधील ‘जीएफए’ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कायतान यांनी चर्चिल आलेमाव यांचे पूत्र सावियो यांचा पराभव केला होता.

एआयएफएफ अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर आय-लीग स्पर्धा समाप्तीनंतर चर्चिल ब्रदर्सचे सर्वाधिक ४० गुण कायम राहिले. निर्णय नामधारी एफसीच्या बाजूने लागल्यामुळे इंटर काशी संघाला ३९ गुणांसह द्वितीय स्थानी समाधान मानावे लागले. नामधारी एफसी संघ ३२ गुणांसह सहाव्या स्थानी राहिला.

अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर इंटर काशी संघाने क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. प्रकरणाच्या मुक्त आणि न्याय्य सुनावणीसाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे (सीएएस) जाणार असल्याचे त्यांनी शनिवारी रात्री जाहीर केले. प्राप्त माहितीनुसार, इंटर काशी संघ या आठवड्यातच क्रीडा लवादाकडे याचिका दाखल करु शकतो. त्यानंतर सुनावणी होऊन एक-दोन महिन्यांत निर्णय येऊ शकतो.

आय-लीग नियमावली आणि सहभाग करारानुसार क्लब ‘सीएएस’कडे दाद मागू शकतात. क्लबना सामान्य न्यायालयात जाता येत नाही. त्यानुसार इंटर काशी ‘सीएएस’कडे जाणार असून क्रीडा लवादाच्या आदेशावरही आय-लीग विजेतेपद अवलंबून असेल. त्यामुळे एआयएफएफ चर्चिल ब्रदर्स संघाला आय-लीग विजेतेपदाचा करंडक कधी प्रदान करतील याबाबत अस्पष्टता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT