Indian Super League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सचा विजयी कमबॅक; इंटर काशीला 1-0 ने नमवत पराभवांची मालिका खंडित

Churchill Brothers vs Inter Kashi: बदली खेळाडू ट्रिजॉय डायस याने उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी इंटर काशी संघाला १-० असे निसटते हरविले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बदली खेळाडू ट्रिजॉय डायस याने उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी इंटर काशी संघाला १-० असे निसटते हरविले. सामना बालेवाडी-पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला.

सामन्याच्या ४६व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या ट्रिजॉय याने ५३व्या मिनिटास केलेला गोल चर्चिल ब्रदर्ससाठी निर्णायक ठरला. त्यामुळे त्यांनी सलग चार पराभवानंतर विजयाची चव चाखली. एकंदरीत त्यांचा हा दुसरा विजय असून सहा सामन्यांतून त्यांचे सहा गुण झाले आहेत. ते आता नवव्या क्रमांकावर आहेत. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना सहा डिसेंबर रोजी कोची येथे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल.

इंटर काशी संघाला सलग चौथा, तर एकंदरीत पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा लढतीनंतर फक्त एका गुणासह ते तळाच्या १३व्या क्रमांकावर कायम राहिले. दोन मोसमापूर्वी आय-लीग विजेतेपदाच्या पार्श्वभूमीवर चर्चिल ब्रदर्स व इंटर काशी या संघांत मैदानाबाहेरही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यानंतर उभय संघांत प्रथमच मैदानावर गाठ पडली. चर्चिल ब्रदर्सने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करत वर्चस्व सिद्ध केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leader Brother Mentor... रोहित शर्माकडे पुन्हा मुंबई इंडियन्सची कर्णधारपदाची धुरा; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया व्हायरल!

ST Reservation: एसटी आरक्षण कायद्याचे सरकारकडून जोरदार समर्थन; मतदारसंघांच्या सीमांत बदल होणार नाही

One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

SCROLL FOR NEXT