Bhausaheb Bandodkar Memorial Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: चेन्नईयीन एफसीची दणदणीत सलामी! चर्चिल ब्रदर्सवर ४-१ फरकाने विजय

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: डिफेन्सा जस्टिसियाचा ओडिशा एफसीविरुद्धचा सामना सुमारे दोन तास उशिरा सुरू झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Bandodkar Football Tournament

पणजी: चेन्नईयीन एफसीने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत दणदणीत सलामी देताना चर्चिल ब्रदर्सवर वर्चस्व राखत ४-१ फरकाने विजय नोंदविला. ब गटातील सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

दोनवेळच्या आय-लीग विजेत्या चेन्नईयीन एफसीच्या विजयात एल्सन डायस (९वे मिनिट), विल्मर गिल (३२वे मिनिट), गुरकिरत सिंग (४४वे मिनिट) व बदली खेळाडू इरफान यादवड (६५वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या १९व्या मिनिटास किलाने डायमांडे याने चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली होती.

डिफेन्सा जस्टिसियाचा सामना लांबला

अर्जेंटिनातील क्लब देपोर्तिव्हो डिफेन्सा जस्टिसिया संघाचे गोव्यातील आगमन लांबल्यामुळे ब गटातील त्यांचा रविवारचा ओडिशा एफसीविरुद्धचा सामना सुमारे दोन तास उशिरा सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT