Jay O'Shea SBS
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: 'ब्रिस्बेन रोअर' बांदोडकर ट्रॉफीसाठी सज्ज; सलामीला एफसी गोवा-स्पोर्टिंग क्लब लढत

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: रुबेन झादकोविच यांच्या मार्गदर्शनाखालील ब्रिस्बेन रोअर संघ अ गटात खेळणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील ए-लीग संघ ब्रिस्बेन रोअर एफसी सज्ज झाला आहे. गतविजेते एफसी गोवा आणि पात्रता फेरीतून आलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यातील लढतीने यंदाच्या स्पर्धेला शनिवारी सुरवात होईल. फातोर्डा येथील पंडित

जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर संध्याकाळी चार वाजता स्पर्धेतील पहिला सामना होईल. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता याच ठिकाणी ब्रिस्बेन रोअर एफसी आणि माजी आय-लीग विजेते धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल.

रुबेन झादकोविच यांच्या मार्गदर्शनाखालील ब्रिस्बेन रोअर संघ अ गटात खेळणार आहे. ए-लीग स्पर्धा मोसम सुरू होण्यापूर्वी ब्रिस्बेनमधील या संघाला तयारीच्या दृष्टीने गोव्यातील स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, रोअर संघाने २०२४-२५ मोसमासाठी करारबद्ध केलेले नवे खेळाडू बेन वॉर्लंड, मार्कुस फर्क्रानस, होसिन बिलिटी, हॅरी व्हॅन डर साग, वालिद शौर, बेन हॅलोरॅन, अॅडम झिमोरिनो यांचा समावेश केला असून गोव्यात या नव्या खेळाडूंची चाचपणी होईल. लुकास हेरिंग्टन, जेम्स डरिंग्टन, इव्हान ओझ्झी हे संघातील युवा खेळाडू असून मुख्य संघात जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ब्रिस्बेन रोअरचा अनुभवी मध्यरक्षक, आयर्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय जॅय ओशिया याने संकेतस्थळावर नमूद केले, की ``परदेशात खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल खेळाडू

उत्साहित आहेत. मोसमपूर्व तयारीत आम्हाला या स्पर्धेत दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याची चांगली संधी मिळत आहे. या स्पर्धेतून आम्हाला नव्या खेळाडूंना जाणून घेण्यात मदत होईल आणि त्यामुळे आत्मविश्वासही वाढेल.``

भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या ब अर्जेंटिनातील प्रिमेरा डिव्हिजन संघ क्लब देपोर्तिव्हा डिफेन्सा जस्टिसिया, तसेच ओडिशा एफसी व चेन्नईयीन एफसी हे आयएसएल संघ आणि गोव्यातील आय-लीग संघ चर्चिल ब्रदर्स यांचा समावेश आहे. स्पर्धेतील अंतिम सामना सहा सप्टेंबरला फातोर्डा येथेच खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT