Goa Cricket Woman Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Goa Cricket Woman Team : गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने बीसीसीआय टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना जम्मू-काश्मीरला आठ विकेट राखून सहज हरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

BCCI Senior Women T20 Cricket Tournament 2024-25

पणजी: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने बीसीसीआय टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना जम्मू-काश्मीरला आठ विकेट राखून सहज हरविले. अ गट सामना गुरुवारी बडोदा येथील कोटंबी क्रिकेट स्टेडियमवर झाला.

गोव्याने जम्मू-काश्मीरचा डाव ८३ धावांत गुंडाळला. गोव्यातर्फे तरन्नुम पठाण हिने तीन, तर पूर्वा भाईडकर हिने दोन गडी बाद केले. पूर्वजा वेर्लेकर व तरन्नुम यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ५९ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर गोव्याने १४.४ षटकांत २ बाद ८६ धावा करून सामना जिंकला. पूर्वजा हिने ३५ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ३६, तर तरन्नुमने २२ चेंडूंत चार चौकारांसह वीस धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

जम्मू-काश्मीर ः १९.४ षटकांत सर्वबाद ८३ (जसिया अख्तर १९, रुद्राक्षी चिब २४, बिस्मा हसन नाबाद २०, शिखा पांडे ४-०-१८-०, तरन्नुम पठाण ४-०-१६-३, सुनंदा येत्रेकर ४-०-१९-१, प्रीती यादव ४-०-२१-०, पूर्वा भाईडकर ३.४-१-९-२) पराभूत वि. गोवा ः १४.४ षटकांत २ बाद ८६ (संजुला नाईक १७, श्रेया परब ६, पूर्वजा वेर्लेकर नाबाद ३६, तरन्नुम पठाण नाबाद २०, बिस्मा हसन ३-०-१२-१, रुबिया सय्यद २-०-१०-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT