BCCI Election Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

BCCI annual meeting: रोहन गावस देसाई यांचे ‘नामनिर्देशन’ कायम राहणार की फेटाळले जाणार, याचा निवाडा शुक्रवारी (ता. १९) होईल.

Sameer Amunekar

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आमसभेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रतिनिधी या नात्याने रोहन गावस देसाई यांचे ‘नामनिर्देशन’ कायम राहणार की फेटाळले जाणार, याचा निवाडा शुक्रवारी (ता. १९) होईल.

बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांच्यातर्फे दाखल आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर निर्णय होईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी मसुदा जाहीर केला जाईल.

रोहन गावस देसाई सध्या बीसीसीआयचे संयुक्त सचिव असून त्यांना २८ रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, जीसीएचे मावळते अध्यक्ष विपुल फडके यांनी जीसीएचे प्रतिनिधी या नात्याने रोहन यांच्या नामनिर्देशनास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयमधील रोहन यांच्या प्रतिनिधित्वावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विपुल यांनी बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आक्षेप पत्रानुसार, रोहन यांचे नामनिर्देशन जीसीएच्या घटनेनुसार अधिकृत प्रतिनिधीने पाठवलेले नाही. जीसीए संविधानानुसार नामनिर्देशन पाठविण्याचा अधिकार सचिवाला असून, संयुक्त सचिवाकडे असा अधिकार नाही.

६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी सूचनेनुसार फॉर्म ‘ए’ अधिकृत प्रतिनिधीने सही केलेला असणे आवश्यक आहे. संघटनेच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष शंभा देसाई यांची कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने, फक्त त्यांनाच जीसीएच्या वतीने पत्रव्यवहाराचा अधिकार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी व्यवस्थापकीय समितीची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्या बैठकीत दोन वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. मात्र, ५ सदस्यांनी ठरावावर सही करण्यास नकार दिल्याने वैध ठराव झालाच नाही.

त्यामुळे बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेले रोहन गावस देसाई यांचे नामनिर्देशन बेकायदेशीर, अवैध असून त्याबाबत १२ सप्टेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे, असे विपुल यांनी पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT