Goa News: कोळवाळ पोलिसांची कारवाई! 13 चोरीचे मोबाईल फोन जप्त, 2.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa Live Updates: कोळवाळ पोलिसांची कारवाई! 13 चोरीचे मोबाईल फोन जप्त, 2.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे अटकेत
ArrestCanva
Published on
Updated on

कोळवाळ पोलिसांची कारवाई! 13 चोरीचे मोबाईल फोन जप्त, 2.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे अटकेत

कोळवाळ पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 13 चोरीचे मोबाईल फोन जप्त करुन दोन आरोपींना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची अंदाजित किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. चोरीच्या मोबाईल फोन्सचा माग काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टल द्वारे मिळालेल्या माहितीवर ही कारवाई करण्यात आली.

मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

मुंगुल हल्ल्याप्रकरणी आरोपी राजेश हेल्माला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुरज मांजीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला, तथापि, परशुराम राठोड यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

साल्वादोर द मुंद येथील बांधकाम परवाने वैधच

बांधकाम परवान्यांवरून वाद निर्माण झालेल्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने साल्वादोर द मुंद, बार्देश येथील जमिनीवरील बांधकामासाठी दिलेले परवाने वैध असल्याचे ठरवत डीन डिक्रूझ यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली.

थिवी रेल्वे स्थानकात ३.३५ लाखांचा गांजा जप्त

कोलवळ पोलिसांनी थिवी रेल्वे स्थानकात २५ वर्षीय रोशन जाप्रेल (मूळ रहिवासी – नेपाळ, सध्या – कळंगुट) याला ३.५ किलो गांजासह पकडले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ३.३५ लाख रुपये इतकी आहे. आरोपी मुंबईहून गोव्यात आला होता आणि तो येथे अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

‘टीसीपी’ भ्रष्टाचारप्रकरणी दक्षता खात्याकडे तक्रार

नगरनियोजन खात्यातर्फे बांधकामांना अतिरिक्त एफएआर (फ्लोअर एरिया रेशो) आणि उंची वाढविण्यासाठी परवानग्या दिल्या गेल्या. त्‍यामुळे राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. या प्रकरणी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दक्षता आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

खारीवाडातील घाऊक मासे विक्रीमुळे तणावाचे वातावरण

खारीवाडा येथे होणारी घाऊक मासे विक्रीसंबंधी मार्केटातील विक्रेत्या आक्रमक झाल्याने वास्को पोलिसांनी घाऊक मासे विक्री होऊ नये यासाठी तेथील गस्त वाढविली आहे. कोणी मासे विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची सगळी मासळी जप्त करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी तेथे सामसूम होते.

शाळांजवळ बेकायदेशीर तंबाखू विक्रीवर छापे

शाळांच्या परिसरात दोन ठिकाणी झालेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी १०,००० रुपयांहून अधिक किमतीची तंबाखूजन्य उत्पादने जप्त केली.

गोवा क्रीडा खात्याला स्कॉच पुरस्कार जाहीर

खेलो गोवातील कामगिरीमुळे क्रीडा खात्याला मानाचा स्कॉच पुरस्कार जाहीर.

मये येथून बेपत्ता झालेली महिला बेळगावात सापडली

हातुर्ली-मये येथून बेपत्ता झालेली महिला बेळगावात सापडली. गेल्या बुधवारी (ता. 10) हातुर्ली येथून चंद्रिका शिरोडकर झाल्या होत्या बेपत्ता.

Tisc Usgao Accident: तिस्क-उसगाव येथे कार व बुलेट यांच्यात अपघात

तिस्क-उसगाव येथे रात्री कार व बुलेट यांच्यात समोरासमोर टक्कर. बुलेट चालक किरकोळ जखमी.

Goa Mining: 7.5 लाख टन खनिजाचा 13 ऑक्टोबरला ई-लिलाव

खाण डंपवर पडून असलेल्‍या ७.५ लाख मेट्रिक टन खनिज मालाचा ई–लिलाव करण्‍याची प्रक्रिया खाण खात्‍याने सुरू केली आहे. त्‍यासंदर्भातील नोटीसही जारी करण्‍यात आली आहे. ई–लिलाव १३ आणि १४ ऑक्‍टोबर रोजी होणार असून, त्‍यातून राज्‍य सरकारला सुमारे १०० कोटींचा महसूल मिळू शकेल, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com