Team India  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

Team India Squad: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली.

Manish Jadhav

Ind vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली. या महत्त्वाच्या मालिकेसाठी दुखापतीमुळे बाहेर असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांचे पुनरागमन झाले. 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांच्या या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल हे दोघेही संघात परतल्यामुळे टीम इंडियाला मोठी ताकद मिळणार आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संघाबाहेर होता. या दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सध्या सुरु असलेली 3 सामन्यांची वनडे मालिका यातूनही त्याने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन तो 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात परतला.

दुसरीकडे, शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान मानेची समस्या जाणवली होती. या कारणामुळे तो वनडे मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. मात्र, आता त्यानेही टी-20 संघात पुनरागमन केले आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या दोन्ही प्रमुख खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघातील संतुलन आणि फलंदाजीची धार वाढेल.

युवा खेळाडूंसह प्रमुख गोलंदाजांना संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील संघाशी मिळताजुळता आहे, ज्यामध्ये अनेक युवा खेळाडूंना सातत्याने संधी देण्यात आली आहे. या संघात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांसारख्या युवा खेळाडूंना कायम ठेवण्यात आले. तसेच, टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली, जो संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे अष्टपैलू आणि फिरकीपटू संघात आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कप्तान), शुभमन गिल (उपकप्तान), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, वाशिंगटन सुंदर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

अखेर न्याय मिळाला! 21 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला कोर्टाचा दणका, सुनावली 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

Virat Kohli ODI Century: शतकांच्या बादशाहचा रायपूरमध्ये धमाका! किंग कोहलीने ठोकले वनडे कारकिर्दीतील 53वे शतक; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात VIDEO

फोनवर बोलत गाडी चालवली, ट्राफिक पोलिसाला धडकला!! जुन्या गोव्यात कदंब बसमुळे 'ट्रॅफिक जॅम; Video Viral

SCROLL FOR NEXT