Alyssa Healy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

Alyssa Healy Unsold: ऑस्ट्रेलियाची अनुभवी आणि कर्णधार एलिसा हीली हिच्याबाबत धक्कादायक निर्णय घेण्यात आला. महिला विश्वचषक 2025 मध्ये शानदार कामगिरी करुनही ती अनसोल्ड राहिली.

Manish Jadhav

Alyssa Healy Unsold: महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या लिलावात (Auction) अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंवर मोठी बोली लागली, तर काही मोठे खेळाडू अनसोल्ड राहिले. लिलावातील मार्की खेळाडूंच्या गटात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिला यूपी वॉरियर्सने मोठी किंमत मोजून आपल्या संघात सामील करुन घेतले.

दीप्ती शर्माला मिळाली मोठी रक्कम

दरम्यान, यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला 3.2 कोटी देत आपल्या संघाचा भाग बनवले. अशारितीने ती महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली. या मोठ्या खरेदीमुळे एकीकडे आनंद व्यक्त होत असतानाच दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची अनुभवी आणि कर्णधार एलिसा हीली (Alyssa Healy) हिच्याबाबत धक्कादायक निर्णय घेण्यात आला. महिला विश्वचषक 2025 मध्ये शानदार कामगिरी करुनही ती अनसोल्ड राहिली.

ऑस्ट्रेलियाई कर्णधार 'अनसोल्ड'

ऑस्ट्रेलियाची (Australia) कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाजांपैकी एक असलेल्या एलिसा हीलीला WPL 2026 च्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही. मार्की खेळाडूंच्या यादीत जेव्हा एलिसा हीलीचे नाव आले, तेव्हा कोणत्याही फ्रँचायझीने तिच्यावर बोली लावली नाही आणि ती अनसोल्ड राहिली. तिची ब्रेस प्राईज 50 लाख रुपये होती. नियमांनुसार, हीली आता 'अनसोल्ड' असली तरी लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात एखाद्या फ्रँचायझीला तिची गरज वाटल्यास, ती 50 लाख रुपयांच्या त्याच बेस प्राईजमध्ये त्या टीमचा भाग बनू शकते.

एलिसा हीलीची शानदार कामगिरी

एलिसा हीली 2025 च्या महिला विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये होती. मात्र लिलावात तिच्यावर बोली न लागल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. विश्वचषकात तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती. महिला विश्वचषक 2025 मध्ये हीलीने 5 सामने खेळले, ज्यात तिने 299 धावा केल्या. या दरम्यान तिने 2 शतकेही झळकावली. संपूर्ण स्पर्धेत तिने 47 चौकार आणि 6 षटकार मारले. WPL मधील आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, हीलीने 17 सामन्यांमध्ये 26.75 च्या सरासरीने 428 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

WPL 2026 च्या लिलावात दीप्ती शर्मासारख्या भारतीय खेळाडूला मिळालेली मोठी किंमत आणि एलिसा हीलीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूकडे दुर्लक्ष होणे, यातून लिलावातील फ्रँचायझींच्या रणनितीमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT