Manohar Parrikar Indoor Stadium Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Manohar Parrikar Indoor Stadium: वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध नसल्याने क्रीडापटू त्रस्त; आमदार तुयेकर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवण्याचा निर्णय तज्ञांच्या पाहणीनंतरच घेतला जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आज विधानसभेत दिले. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

तुयेकर म्हणाले, ‘‘इनडोअर स्टेडियममधील प्रखर दिव्यांमुळे उकाडा वाढतो. मध्यंतरी बॅडमिंटन स्पर्धेवेळी तापमान कमी करण्यासाठी कुलर लावावे लागले होते. अनेक क्रीडा प्रकरांसाठी हे स्टेडियम वापरले जाते. ४३ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या स्टेडियमवर वाहतानुकूलन यंत्रणेची नितांत गरज आहे. त्या ठिकाणी उपहारगृह नसल्यामुळे साधे पाणीही मिळत नाही. सुरक्षा रक्षकही नाही.’’

देखभालीचा खर्च मोठा; क्रीडामंत्री

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोल बॉल, नेट बॉल आणि बास्केट बॉल स्पर्धा नावेली येथे घेण्यात आली होती. क्रीडा प्रकारांसाठी वापरण्यात येणाऱ्या सभागृहामध्ये १८ ते ३० अंश सेल्सिअसचे तापमान असावे लागते. वायुविजनाची वेगळी व्यवस्था ठेवावी लागते. यासाठी सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात.

वातानुकूलन यंत्रणा बसवल्यावर देखभालीचा खर्च मोठा असणार आहे. प्रेक्षागृहामध्ये वारे वाहण्याची व्यवस्था आहे. खेळाडू वापरत असलेल्या भागांमध्ये वायुविजन कसे असावे याचे निकष असतात. त्यानुसार पाहणी करूनच निर्णय घेतला जाईल. उपहारगृह सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. सुरक्षारक्षक व इतर बाबीं बाबत आमदारांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न सोडविला जाईल.’’

जमीन उपलब्ध असल्यास डिचोलीत क्रीडा संकुल

डिचोलीत आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी जमीन उपलब्ध करून दिली, तर तेथे प्राधान्याक्रमाने क्रीडा संकुल उभारू, असे आश्वासन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी राज्य विधानसभेत दिले. याविषयीचा प्रश्न आमदार डॉ. शेट्ये यांनीच विचारला होता.

डॉ. शेटये म्हणाले, इतर तालुक्यात क्रीडा संकुले आहेत, मात्र डिचोलीकडे सरकारचे लक्ष नाही. डिचोलीच्या बृहद आराखड्यात क्रीडा संकुलासाठी उपयुक्त अशी २४ हजार चौरस मीटर जमीन आहे. तिचे संपादन क्रीडा संकुलासाठी करता येईल.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, मेणकुरे, नार्वे येथील क्रीडा मैदानांची कामे हाती घेतली आहेत. डिचोली तालुक्याकडेही क्रीडा खात्याचे लक्ष आहे. डिचोलीत क्रीडा संकुल उभारण्यासाठी आमदारांनी जागा दाखवली तर तेथे क्रीडा संकुल प्राधान्याने उभारण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT