Anil Kumble  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

Anil Kumble on Ravindra Jadeja: लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 22 धावांनी पराभव पत्करावा लागला.

Manish Jadhav

Anil Kumble on Ravindra Jadeja: लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 22 धावांनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. या सामन्यानंतर जगभरातील क्रिकेट तज्ज्ञ आपापली मते मांडत आहेत. याच अनुषंगाने भारताचे माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळे यांनी एक धक्कादायक विधान करत अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कुंबळे यांचा जडेजाच्या 'अप्रोच'वर आक्षेप

कुंबळे यांच्या मते, लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या डावात फिरकीपटू शोएब बशीर गोलंदाजी करत असताना रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मोहम्मद सिराजला स्ट्राईक देण्याऐवजी स्वतः धोका पत्करुन आक्रमक फटके खेळायला हवे होते. जर त्याने असे केले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. या सामन्यात रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या साथीने भारतीय संघाला विजयाच्या जवळ आणले होते, पण अखेर तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

अनिल कुंबळेंनी व्यक्त केले मत

जिओ हॉटस्टारच्या हवाल्याने अनिल कुंबळे म्हणाले की, "मला हा सामना पाहून चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेला कसोटी सामना आठवला, ज्यात आमचा संघ 12 धावांनी हरला होता. सिराजचे बाद होणे काहीसे तसेच होते. संघ लक्ष्यापासून केवळ 22 धावा दूर होता. जडेजा एका बाजूने नुसताच उभा राहिला. माझे म्हणणे असे आहे की, त्याने भारताला (India) विजयाच्या इतक्या जवळ आणण्यात यश मिळवले, पण इंग्लंडने कोणतीही ढिलाई दिली नाही."

'जडेजाने गोलंदाजांना लक्ष्य करायला हवे होते'

कुंबळे पुढे म्हणाले की, ''जडेजाने आपल्या सोयीनुसार गोलंदाजांना लक्ष्य करायला हवे होते. क्रिस वोक्स, जो रुट आणि बशीर असे गोलंदाज होते. बशीर आणि रुट भलेही ऑफस्पिनर असले तरी त्यांचा चेंडू खूप जास्त वळत नव्हता. अशा परिस्थितीत जर कुणी धोका पत्करायचा असेल, तर तो जडेजानेच पत्करायला हवा होता. त्याने बुमराह आणि सिराजसोबत फलंदाजी करताना आपल्याकडे जास्त स्ट्राईक ठेवून चांगले काम केले, पण सिराजला बशीरचे पूर्ण षटक खेळू देणे धोकादायक होते. त्याऐवजी त्याने स्वतःच आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ बाणावलीतून लढवणार विधानसभा निवडणूक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT