Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Manolo Marquez: FC Goa चे मार्गदर्शक मानोलो आता भारतीय संघाचे हेड कोच; दुहेरी जबाबदारी

All-India Football Federation: सलग दुसऱ्या मोसमात ५५ वर्षीय मार्केझ एफसी गोवा संघाचेही मुख्य प्रशिक्षक असतील

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय फुटबॉलमध्ये इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सफल प्रशिक्षकांत गणले जाणारे एफसी गोवाचे स्पॅनिश मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांच्याकडे २०२४-२५ मोसमात दुहेरी जबाबदारी असेल.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) शनिवारी मार्केझ यांना भारतीय राष्ट्रीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केले. नवी दिल्ली येथे अध्यक्ष कल्याण चौबे व एआयएफएफ कार्यकारी समिती बैठकीत मार्केझ यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. त्याचवेळी सलग दुसऱ्या मोसमात ५५ वर्षीय मार्केझ एफसी गोवा संघाचेही मुख्य प्रशिक्षक असतील.

मार्केझ यांच्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीचे एफसी गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवी पुस्कुर यांनी स्वागत केले आहे.

दुहेरी जबाबदारीविषयी रवी म्हणाले, की ``मानोलो मार्केझ यांच्याकडे आमच्या संघाची सूत्रेही कायम राहतील. एफसी गोवा संघासाठी विजयी संस्कृती उभारणीत महत्त्वाचा भाग या नात्याने आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत.``

मागील जून महिन्यात क्रोएशियन इगोर स्टिमॅक यांना भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला आगामी विश्वकरंडक २०२६ फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील तिसरा टप्पा गाठण्यास अपयश आले होते, तसेच स्टिमॅक व एआयएफएफ अध्यक्ष कल्याण चौबे यांच्यातील संबंधांत कमालीची कटुता आली होती.

मानोलो मार्केझ यांच्याविषयी

२०२० पासून भारतात प्रशिक्षक या नात्याने कार्यरत

२०२०-२३ कालावधीत हैदरबाद एफसीचे मुख्य प्रशिक्षक

२०२१-२२ मध्ये मार्गदर्शनाखाली हैदराबादला आयएसएल करंडक विजेते

२०२३-२४ मोसमापासून एफसी गोवाचे मुख्य मार्गदर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT