National Games 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Games 2025: फुटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; कधी होणार गोव्याचा सामना, कोणत्या संघाशी करणार दोन हात? वाचा सविस्तर

National Games 2025 Schedule: २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पुरुष व महिला फुटबॉल स्पर्धेतील गटवारी आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Sameer Amunekar

38th National Games 2025

पणजी: उत्तराखंडमध्ये २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पुरुष व महिला फुटबॉल स्पर्धेतील गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. पुरुष विभागात गोव्याचा अ गटात समावेश आहे.

पुरुष गटातील सामने ३० जानेवारीपासून, तर महिला गटातील सामने २९ जानेवारीपासून हल्दवानी येथे खेळले जातील. गोव्यात २०२३ साली झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये पुरुष गटात सेनादलाने, तर महिलांत ओडिशाने विजेतेपद मिळविले होते.

दोन्ही विभागात प्रत्येकी आठ संघ आहेत. यजमान उत्तराखंडचा अपवाद वगळता २०२३-२४ मधील संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष स्पर्धा आणि राजमाता जिजाबाई करंडक राष्ट्रीय सीनियर महिला स्पर्धेतील पहिल्या सात संघांची निवड करण्यात आली.

गोव्याचा स्पर्धेतील पहिला सामना ३० रोजी आसामविरुद्ध होईल, नंतर १ फेब्रुवारी रोजी मिझोरामविरुद्ध, तर ३ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडविरुद्ध सामना होईल.

पुरुष विभागातील गटवारी

  • अ गट - गोवा, उत्तराखंड, मिझोराम, आसाम,

  • ब गट - सेनादल, केरळ, मणिपूर, दिल्ली.

महिला विभागातील गटवारी

  • अ गट - हरियाना, तमिळनाडू, सिक्कीम, ओडिशा,

  • ब गट : मणिपूर, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT