Shubham Debnath Gold Medal in Traditional Yogasana @dip_goa
गोंयचें खेळामळ

38th National Games: जलवा...! गोव्याच्या शुभमचा 'सुवर्ण'वेध; पारंपारिक योगासनात नोंदवली शानदार कामगिरी

Shubham Debnath Gold Medal in Traditional Yogasana: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या शुभम देबनाथने पारंपारिक योगासनात दुसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Manish Jadhav

38th National Games: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या शुभम देबनाथने पारंपारिक योगासनात दुसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. गतवर्षी गोव्यात झालेल्या 37व्या राष्ट्रीय स्पर्धेतही शुभमने पारंपरिक योगासनात सुवर्णपदकाची कमाई केली होती. विशेष म्हणजे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात योगासनात गोव्यासाठी पहिले पदक जिंकण्याचा मान शुभमने मिळवला होता. गोव्यासाठी योगासनात दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलेला शुभम देबनाथ हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये झालेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुभमने पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी त्याने माध्यमाशी बोलताना सांगितले होते की, ‘‘गतवर्षी मी पश्चिम बंगालतर्फे रौप्यपदक जिंकले, परंतु यंदा परीक्षांमुळे तेथील राज्यस्तरीय स्पर्धेत खेळू शकलो नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही. गोव्याकडून खेळण्याची विचारणा झाली आणि सुवर्णपदकाचे लक्ष्य बाळगून मी नऊ महिन्यांपासून गोव्यातील योग संघटनेशी बांधील आहे.''

स्क्वॉशमध्ये 'गोल्ड' जिंकलं

दुसरीकडे, आकांक्षा साळुंखेने काल म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला स्क्वॅशमध्ये सुवर्णपदक जिंकून तमाम गोमंतकीयांना आनंदाची बातमी दिली होती. यातच, आज शुभमने पारंपारिक योगसनात सुवर्णपदक जिंकून गोमंतकीयांच्या आनंदात आणखी भर घातली. याआधी 2023 मध्ये 37व्या क्रीडा स्पर्धेतही आकांक्षाने सुवर्णपदक जिंकले होते. सक्रिय महिला स्क्वॉशमध्ये भारताची प्रमुख खेळाडू असणाऱ्या आकांक्षाने अंतिम फेरी गाठल्यामुळे 38व्या राष्ट्रीय क्रि़डा स्पर्धेतील गोव्याचं सुवर्ण अथवा रौप्यपदक आधील निश्चित झालं होतं. अखेर चांगली कामगिरी करत आकांक्षानं सुर्वणपदक जिंकलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT