Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Manolo Marquez: प्रशिक्षक मार्केझ करणार 'शतक'! शंभर आयएसएल सामन्यांचा टप्पा पूर्ण; गोव्यातील वास्तव्याबाबत म्हणाले की..

FC Goa Coach Manolo Marquez: हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्‍टेडियमवर बुधवारी (ता. ४) हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांच्यातील सामना ५६ वर्षीय मार्केझ यांच्यासाठी संस्मरणीय ठरेल. त्यांनी पूर्वी हैदराबाद एफसी व आता एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने ९९ सामन्यांत जबाबदारी पेलली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

100th ISL Match For FC Goa Coach Manolo Marquez

पणजी: स्पॅनिश मानोलो मार्केझ यांनी चार वर्षांपूर्वी हैदराबाद एफसीतर्फे भारतातील मार्गदर्शन कारकिर्दीस सुरवात केली होती, आता त्याच संघाविरुद्ध एफसी गोवाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मैलाचा दगड पार करतील. शंभर आयएसएल सामन्यांत प्रशिक्षकपद भूषविणारे ते अवघे तिसरे ठरतील.

हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्‍टेडियमवर बुधवारी (ता. ४) हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांच्यातील सामना ५६ वर्षीय मार्केझ यांच्यासाठी संस्मरणीय ठरेल. त्यांनी पूर्वी हैदराबाद एफसी व आता एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने ९९ सामन्यांत जबाबदारी पेलली आहे. ‘शतकी’ सामन्यात आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध विजयाच्या पूर्ण तीन गुणांचा ध्यास मार्केझ यांनी बाळगला आहे. सध्या त्यांच्याकडे दुहेरी जबाबदारी आहे. एफसी गोवाबरोबरच ते भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचेही मुख्य प्रशिक्षक आहेत.

‘‘हैदराबादमध्ये परतण्याची भावना खास आहे, त्यातच भारतातील माझ्या पहिल्या संघाविरुद्ध शंभरावा आयएसएल सामना हा एक छान योगायोग आहे. तेथे हा टप्पा गाठणे माझ्यासाठी विशेष आहे. हैदराबाद शहरावर माझे प्रेम आहे, पण हे सारे बुधवारी सामना सुरू होण्यापूर्वीपर्यंतच असेल. सामना सुरू झाल्यानंतर लक्ष्य फक्त पूर्ण तीन गुणांचेच राहील,’’ असे मार्केझ यांनी सोमवारी पर्वरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले. यापूर्वी अंतोनियो लोपेझ हबास व सर्जिओ लोबेरा या स्पॅनिश प्रशिक्षकांनीच आयएसएलमध्ये ‘शंभरी’ पार केलेली आहे. त्यापैकी ओडिशा एफसीतर्फे लोबेरा आयएसएल स्पर्धेत अजूनही सक्रिय आहेत.

एफसी गोवा संघ स्थिरावतोय

आयएसएलमधील ‘शतकी’ प्रशिक्षक या नात्याने भावनिक कप्पा खुला करताना मार्केझ यांनी व्यावसायिकताही जपली. बुधवारच्या सामन्याविषयी ते म्हणाले, की ‘‘खरं आहे की यावेळच्या आमच्या मोसमाची सुरवात चांगली नव्हती. खेळाडूंच्या दुखापती, नवे खेळाडू यामुळे प्रारंभ अपेक्षित नसेल याची जाणीव संघ व्यवस्थापनासह साऱ्यांनाच होती. मला संघाबाबत विश्वास होता आणि संघ आता स्थिरावू लागलाय. आमच्या राखीव फळीतही चांगले खेळाडू आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्यासाठी यावेळचा मोसम खूपच चांगला ठरणार आहे.’’ एफसी गोवा संघ आता मागील चार सामन्यांत अपराजित असून बरोबरीनंतर सलग तीन विजय नोंदविले आहे. त्यांचे आता नऊ लढतीतून १५ गुण आहेत.

हैदराबाद, गोव्यातील वास्तव्य सुखदायक

मार्केझ म्हणाले, ‘‘प्रशिक्षक या नात्याने भारतातील माझा यंदा पाचवा मोसम आहे. मी आत्मचरित्र लिहिले, तर त्याचे पहिले प्रकरण माझ्या भारतात येण्याविषयी असेल. भारतात येण्यासाठी विमान चढलो तेव्हा स्वतःलाच प्रश्न विचारला होता, की तू ये काय करतो आहेस? भारत माझ्यासाठी आता दुसरे घर आहे, कारण स्पेनवगळता इतर देशात मी इतका काळ व्यतित केलेला नाही. भारतातील दोन जागा माझ्यासाठी खास आहेत, हैदराबाद शहर आणि गोवा राज्य. त्यास मी भाग्य मानतो. या दोन्ही ठिकाणी मी आनंद लुटला. येथे वास्तव्य खूपच सुखदायक ठरले आहे.’’

मार्केझ यांचा भारतातील प्रवास

ऑगस्ट २०२० मध्ये हैदराबाद एफसीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त

फेब्रुवारी २०२१ मध्ये करारात दोन वर्षांसाठी वाढ

आयएसएलमध्ये हैदराबाद एफसी २०२०-२१ मध्ये पाचव्या स्थानी, २०२१-२२ मध्ये आयएसएल करंडक जेतेपद, २०२२-२३ साखळी फेरीत दुसरा क्रमांक

जून २०२३ मध्ये एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

आयएसएलमध्ये २०२३-२४ मध्ये एफसी गोवा साखळी फेरीत तिसऱ्या स्थानी, करंडकाच्या उपांत्य फेरीत

एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने आतापर्यंत ३४ सामने, १८ विजय, ९ बरोबरी, ७ पराभव

आयएसएलमध्ये प्रशिक्षक या नात्याने ९९ सामने, ४९ विजय, ३१ बरोबरी, १९ पराभव

जुलै २०२४ मध्ये भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी

आयएसएलमध्ये ‘शतक’ नोंदविणारे प्रशिक्षक ः सर्जिओ लोबेरा (११३ सामने), अंतोनियो लोपेझ हबास (११२ सामने)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT