Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

ZP Election: शिरोडकरांनंतर काँग्रेसची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झालीय; शिरोड्यात भाजप हॅटट्रिक करणार?

ZP Election Goa: ‘आयआयटी’साठी जमिनीला विरोध झालेला कोडार हा भाग बोरी जि.पं. मतदारसंघात येत असल्यामुळे या प्रकरणाचा काय परिणाम झाला, याचे उत्तरही या जि.पं. निवडणुकीत मिळणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: जिल्हा पंचायतीच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यात लगबग सुरू झाली आहे. फोंडा तालुक्यातील शिरोडा विधानसभा मतदारसंघात दोन जि. पं. संघ असून दोन्हीही ठिकाणी भाजपचेच सदस्य आहेत. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ भाजप आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पंचवाडी आणि शिरोडा या दोन पंचायतींचा समावेश असलेल्या शिरोडा जि. पं. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे नारायण कामत हे करत आहेत, तर बोरी आणि बेतोडा - निरंकाल या दोन पंचायतींचा समावेश असलेल्या बोरी जि. पं. मतदारसंघातही भाजपचे दीपक नाईक बोरकर हे विद्यमान सदस्य आहेत. कामत आणि बोरकर हे जि.पं. सदस्य म्हणून निवडून येण्याची ही दुसरी वेळ आहे. कामत हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते.

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याबरोबर तेही भाजपवासी झाले आहेत. बोरकर मात्र पूर्वीपासून भाजपमध्येच आहेत. आता आगामी निवडणुकीत या दोघांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसून येते. सध्या शिरोडा मतदारसंघात भाजप विरोधक नक्की कोण आहेत, हेच कळत नाही. काँग्रेसबाबत बोलायचे तर सुभाषभाऊंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे.

अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुभाषभाऊंसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे इथली काँग्रेस दुर्बल झाली आहे. त्यातच केंद्रीय समितीचे नेतेही शिरोड्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे इथल्या काँग्रेसची स्थिती अधिकच बिकट होऊ लागली आहे. ‘आयआयटी’साठी जमिनीला विरोध झालेला कोडार हा भाग बोरी जि.पं. मतदारसंघात येत असल्यामुळे या प्रकरणाचा काय परिणाम झाला, याचे उत्तरही या जि.पं. निवडणुकीत मिळणार आहे.

सुभाषभाऊंसाठी ‘सेमीफायनल’

सुभाष शिरोडकर हे शिरोडा मतदारसंघातून तब्बल आठवेळा निवडून आले आहेत. असा विक्रम करणारे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यानंतरचे ते दुसरे आमदार आहेत. साहजिकच त्यांचे वर्चस्व शिरोड्यावर अधोरेखित होते. झेडपी निवडणुकीनंतर वर्षभरातच विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे ही निवडणूक सुभाषभाऊंसाठी ‘सेमी फायनल’ ठरू शकते.

विरोधक एकवटणार की विखुरणार?

विधानसभेसाठी इच्छुक असलेले अभय प्रभू यांनी भाजपविरोधात एक नवा चेहरा रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले. गत विधानसभा निवडणुकीत ५०६३ मते प्राप्त केलेला आरजी पक्ष यंदा काय भूमिका घेतो? येथे विरोधी पक्ष एकवटतात, की विखुरतात, हे काय पहावे लागेल.

- मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT