Future of renewable energy Canva
गोंयकाराचें मत

Solar Energy: सध्या गोवा वीजेबाबतीत 'परावलंबी', सौर ऊर्जेची कास धरली तर 'स्वयंपूर्ण' होऊ शकतो

Solar Energy Goa: शाश्वत ऊर्जेचे आज जे पर्याय आहेत त्यापैकी सूर्याची ऊर्जा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. भविष्यकाळातही तो सर्वोत्तम असणार आहे.‌

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनव आपटे 

शाश्वत ऊर्जेचे आज जे पर्याय आहेत त्यापैकी सूर्याची ऊर्जा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. भविष्यकाळातही तो सर्वोत्तम असणार आहे.‌ पेट्रोल, गॅस, डिझेल, कोळसा, एलपीजी इत्यादी इंधने कधी ना कधीतरी संपुष्टात येतील मात्र सूर्य पुढील अब्जावधी वर्षे अस्तित्वात असणार असल्यामुळे तो शाश्वत इंधनाचा त म्हणून राहणार आहे. वारा हा देखील एक ऊर्जा स्रोत आहे परंतु त्याला मर्यादा आहेत. तो कमी जास्त होऊ शकतो. सूर्याचे तसे नाही. मुख्य म्हणजे सूर्याची उष्णता ही मोफत आहे. ती मिळण्यासाठी आपल्याला फार काही करावे लागत नाही. 

सोलर हीटर, सोलर कुकर, सोलर ड्रायर वगैरे उपकरणे खूप काळापासून वापरात आहेत त्याशिवाय आता सूर्याची उष्णता वापरून त्यातून आपण वीज निर्मितीही करू शकतो.‌ त्यासाठी सरकारच्या बऱ्याच योजना देखील आहेत. प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सौर यंत्रणा वापरून तयार झालेली वीज सरकार पुन्हा विकतही घेऊ शकते अशीही व्यवस्था आहे. पडीक जमिनीत सौर यंत्रणा बसवून आपण आज वीज निर्माण करू शकतो व विकूही शकतो.‌ सध्या दर युनिटमागे ४ रुपये ८ पैसे असा विजेचा दर सरकार अदा करत आहे. 

या सौर ऊर्जेकडे अजून लोकांनी गंभीरपणे लक्ष दिलेले नाही. याची काही कारणेही आहेत. पहिले सर्वात महत्त्वाचे कारण हे आहे की त्यात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. अर्थात त्यासाठी सरकार अनुदान देते, पण एकंदरीत सर्वसामान्य लोकांनी सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेतलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याशिवाय नाविन्याच्या बाजूने लोकांची असलेली उदासीनता हे देखील त्याचे एक कारण असू शकते. 'चालले आहे ते चालू द्या' ही मानसिकता त्यामागे कदाचित असावी. लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचणे आणि लोकांनी ते स्वीकारणे यासाठी खूप वेळ लागतो.‌ तेवढा वेळ सौर ऊर्जेचे महत्त्व देखील लोकांपर्यंत पोहोचण्यास लागेल हे आपण गृहीत धरायला हवे. 

दीर्घकालाचा विचार केल्यास सौर ऊर्जा ही निश्चितच स्वस्त आहे.‌ त्यासाठी असलेल्या सरकारच्या अनुदानाचा जर फायदा घेतला तर ती अधिकच स्वस्त पडू शकते आणि ती नेचर फ्रेंडली तर आहेच. आज आपला गोवा  वीज ऊर्जेच्या बाबतीत परावलंबी आहे मात्र जर सौर ऊर्जेची आपण कास धरली तर निश्चितपणे आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा संबंधित उपकरणे बसवली जायला हवीत. सौर ऊर्जेचा पाठपुरावा करणे आज अत्यंत गरजेचे आहे.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT