Shivlila Manerikar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shivlila Manerikar Success Story: सरकारी नोकरीची संधी सोडून पिठाचा व मसाल्याचा व्यवसाय, 53 वर्षीय शिवलीला मणेरीकरांची यशोगाथा वाचा

Women's Day 2025: कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक महिलेमध्ये असते. अशाचपैकी एक उपक्रमशील महिला आहेत, वेर्ला-काणका-बार्देशमधील ५३ वर्षीय शिवलीला दीपक मणेरीकर.

गोमन्तक डिजिटल टीम

Shivlila Manerikar Urja Brand Flour Spices Business Goa

योगेश मिराशी

म्हापसा: कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक महिलेमध्ये असते. अशाचपैकी एक उपक्रमशील महिला आहेत, वेर्ला-काणका-बार्देशमधील ५३ वर्षीय शिवलीला दीपक मणेरीकर. शिवलीला यांनी सरकारी नोकरीची मिळणारी संधी सोडून, स्वतःचा पिठाचा व मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. चाचणी आधारावर सुरू केलेला हा छोटासा लघुव्यवसाय आता भरभराटीस पोहोचला आहे.

शिवलीला मणेरीकर यांनी स्वतः पिठाच्या उद्योगात स्वयंपूर्ण होत, ‘ऊर्जा’ ब्रँडच्या माध्यमातून आठजणांना रोजगार निर्मितीसाठी काम उभे केले आहे. त्यांच्या फॅक्टरीत, पाच महिला व तीन पुरुष मंडळी कामाला आहे.

‘ऊर्जा ब्रँड’ म्हणून त्यांनी पिठाची गिरण सुरू केली. आता त्यामाध्यमातून शुद्ध पीठ घराघरांमध्ये पोहोचवत आहेत. काणका-वेर्ला, बार्देश येथे शिवलीला मणेरीकर यांची फॅक्टरी आहे. ‘ऊर्जा ब्रँड’ची स्थापना २००१मध्ये झाली. गोव्यातील (Goa) नावलौकिक सुपरमार्केटपासून ते जनरल स्टोअरमध्ये ‘ऊर्जा ब्रँड’ची ३२ प्रकारची पिठे व सात प्रकारचे मसाले तयार स्वरूपात पॅक करून विकले जातात. या पिठांमध्ये नाचण्याचे अंकुरलेले सत्त्व, रागी पीठ, साबुदाणा, शिंगाडा, चणा-सतु, वडा पीठ, बाजरी, उपवासाला राजगिरा, तांदूळ, गहू, ज्वारी, रवा आदींचा समावेश आहे. तर मसल्यांमध्ये दालचिनी, लवंग पावडर, पकोडा मिक्स, मेथी, जिरा आदींचा समावेश आहे. ‘ऊर्जा’ची गुणवत्ता व पॅकिंगमुळे सध्या या ब्रँडने घराघरांत हक्काचे स्थान मिळविल्याचे शिवलीला मणेरीकर अभिमानाने सांगतात.

लोकांमध्ये वाढली विश्वासार्हता

शिवलीला मणेरकर यांनी पदव्युत्तर अभ्याक्रमात व्यवसाय (Business) व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीच्या काळात खासगी नोकरी केल्यानंतर, तसेच घरावर ओढवलेल्या आर्थिक संकटानंतर त्यांनी स्वतःचा लहानसा घरगुती व्यवसाय सुरू केला. ज्यामध्ये आधी त्यांनी इस्पितळात रुग्णांसोबत राहणाऱ्यांसाठी घरगुती शाकाहारी डबे देण्यास सुरुवात केली. वर्षभर त्यांनी हा व्यवसाय चालवला.

कालांतराने, शिवलीला यांनी उद्योग सुरू करण्यास लागणाऱ्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करीत, आपल्याकडील काही पैसे गुंतवून स्वतःची गिरण सुरू केली. या माध्यमातून पीठ बनवून त्या पॅकिंग स्वरूपात विकू लागल्या. हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायाला मोठे स्वरूप दिले. आता शिवलीला यांचा ‘ऊर्जा’ हा ब्रँड नावारूपास आला असून, स्वतःची वेगळी ओळख व गुणवत्ता त्यांनी टीकवून ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आहे.

प्रामाणिकपणा महत्त्वाचा !

मुळात कष्ट करण्याची जिद्द असल्यास तुम्हाला यश हमखास मिळते. कामात प्रामाणिकपणासोबत स्वच्छता व गुणवत्ता टिकवून ठेवल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. ‘ऊर्जा ब्रँड’च्या माध्यमातून माझ्यासह आठ घरे चालतात. जरी कामगारांना मी विलासी जीवन देऊ शकत नसले तरी, आरामदायी जीवन देते, याचा मला सार्थ अभिमान आहे. महिलांनी स्वतःसाठी काहीतरी करावेच तसेच समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे शिवलीला मणेरीकर यांनी सांगितली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT