Prayagraj Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Prayagraj: प्रयाग तीर्थाची डुबकी आणि दैनंदिन व्यवसायाने धुतली जाणारी पापे!

Prayagraj pilgrimage: प्रयाग तीर्थात डुबकी मारून शुद्ध झालेले अनेक लोक, जे तिथे पोहोचले नाहीत त्यांना एका तुच्छ नजरेने पाहत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Prayagraj Pilgrimage Purity And Inner Awakening

डॉ. व्यंकटेश हेगडे

प्रयाग तीर्थात डुबकी मारून शुद्ध झालेले अनेक लोक, जे तिथे पोहोचले नाहीत त्यांना एका तुच्छ नजरेने पाहत आहेत. आपण अगदी शुद्ध पापमुक्त होऊन आलो आणि जे काही कारणास्तव तिथे पोहोचले नाहीत ते अभागी आहेत, पापी आहेत हा भाव प्रयागराजला जाऊन आलेल्या अनेकांचा.

प्रयागराजांत (Prayagraj) स्नान करून शुद्ध व्हायचे, ही आपल्या भारत देशातली एक खूप सुंदर कल्पना. एक श्रेष्ठ आविष्कार. पण एक उमगायला हवेच. तिथे जाऊन आल्यावर तरी आपण प्रेम, शांती, आनंद, करुणा या मानवी मूल्यांत यावे. या संगमावरील पाणी शुद्ध आहे, असे शास्त्रज्ञांनीही शोधून काढलेय. पण या शुद्ध पाण्यांतून, स्वत:मध्ये एक ज्ञानमार्ग, अगदी कणाकणांत रिझवून आपण जागे व्हायला हवे. हो... एक सुंदर जागृती. माझ्यातल्या राग, द्वेष, अहंकार, वासना, ईर्ष्या, लोभ या राक्षसी गुणांना इथे या संगमात सोडून देणार. हे माझ्यातले राक्षसी गुण आहेत त्याची जागृती या संगमावर यावीच.

पापक्षालन म्हणजे हेच. ते तर प्रयागराजला न जाताही आपण आपल्या घरी बसून करू शकतो. आपल्या कामात अगदी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग आणायचा. प्रत्येक काम आवडणारे, आणि न आवडणारे काम कणाकणांत उत्साह, आनंद व जोश भरून करायचे.

आपल्या शब्दाने, वर्तनाने आणि कृतीने कुणालाही दु:ख पोहोचू नये याची नितांत काळजी घ्यायची. स्तुतीतून आणि कृतीतून समाजाला आनंद द्यायचा. एखादा दु:खात असेल तर सेवाभावांतून त्याला त्याच्या त्रासातून मुक्त करायचे. मग एक हृदयांतून उगवणारे हास्य आपल्यातही अवतरते आणि कुणा दु:खी माणसातही, ज्याच्या जीवनाला तुमचा अमृत स्पर्श लागला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी समाजाला योग्य दिशा दाखवताना, स्वत:मधल्या दैवी गुणांतून बहरत स्वत:मधल्या देवत्वाचा साक्षात्कारच आपल्या अंतरात व्हायचा कसा हे शिकवले. माझ्यातही देवत्व आहे हे समजले, उमगले तर मग स्वत:मधले पाप धुतले जातेच. एक श्रेष्ठ सुंदरता जीवनाचाच उत्सव बनवते. मग पापे धुवायला प्रयागराजच्या संगमांत डुबकी मारायची गरज नाही.

महाकुंभमेळ्यात डुबकी मारली की आपली सर्व पापे धुतली जातील. आपण शुद्ध होऊ. हा विचार आज समाजामध्ये चालतोय आणि म्हणून लाखो लोक या गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान करून आले. सामान्य माणसांबरोबर आपले नामांकितही अनेक अतिमहनीय व्यक्तींनी तिथे जाऊन डुबकी मारली.

डुबकी मारून आलेले अनेकजण जणू आपण खूपच काहीतरी मिळवले या मानसिक स्थितीत आहेत. अनेकांना तर या वर्तनातून अगदी मद चढलाय. डुबकी मारून आलेले अनेकजणांची छाती गर्वाने फुगली आणि एका तुच्छ नजरेने ते जे लोक गेले नाहीत त्यांना बघताहेत. त्रिवेणी संगमात स्नान करून पापे धुतली हा समज करून घेतला आणि मग अनेकांच्या वर्तनात अहंकार खुलला. एक मोठी कर्तबगारी आपल्या हातून घडली याचा अहंकार आणि तिथपर्यंत ‘तुम्ही’ पोहोचला नाहीत याबद्दल एका तुच्छतेने बाकीच्या लोकांना बघणे. आपल्या शब्दाशब्दांतून कुंभमेळ्याची आणि स्वत:चीच महती सांगणे.

कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर असे म्हणतात की, एक वेगळी अनुभूती येथे येते. ‘नर ही नारायण’ म्हणजे प्रत्येक माणसांतला देव प्रकटतो आणि अनुभवायला येतो. ‘देव दिसे ठायी ठायी, भक्त लीन भक्तापायी’ ही अनुभूती यावीच. अनेकांना आलीही.

आपल्या भारतामध्ये पापक्षालन करणारे प्रयागराज तीर्थ आहे. गंगा, यमुना, सरस्वती यांचा त्रिवेणी संगम. स्नान केल्यावर एक भावना अशी आहे की, आपल्या जन्मात आपण पाप केले असेल तर ते धुतले जाते आणि पापाचे फळ भोगण्याचा प्रसंग येत नाही. आपले संस्कार शुद्ध होतात आणि आपला अहंकार विरघळून आपण आपल्या तपाचे पुण्य पापाचे फळही त्रिवेणी संगमात समर्पित करतो.

गंगेत ज्ञान आहे, यमुनातीरी रासलीला झाली म्हणून तिथे आनंद आहे आणि सरस्वती ज्ञानाची देवी मग तिथे ज्ञान आहे आणि प्रज्ञा आहे. एक करायचे. स्वत:मधल्या दैवी गुणांतून, कदाचित काही जीवनात घडलेल्या पापांतून घसरलेल्या आपल्या चैतन्याला आपण स्वत:च देव होऊन माफ करायचे. श्रेष्ठ साक्षात्कारातून आपण कुठलेही पाप केले नसून ‘मी शुद्ध आहे’ मी देव आहे हे उमगायचे. एखाद्या ध्यानासारख्या साधनेतून, प्रसन्न, तृप्त व शांत व्हायचे. बुद्धी आणि शक्तीतून अनेकांची सेवा करून त्यांच्या जीवनातल्या काळोखात प्रखर उजेड आणायचा. परमेश्वराचे भजन, कीर्तन, नामस्मरणात थोडा वेळ अगदी पूर्ण रंगून जाऊन, स्वत:चे देहभान विसरून आनंदी व्हायचे.

सगळी पापे अगदी घरात आपल्या दैनंदिन व्यवसायात मग्न असतानाही धुतली जाऊ शकतात. तुम्ही प्रयागराजला डुबकी मारली नाही तरी देवत्वात मग्न राहा. सगळी पापे गेली. या अत्युच्च आध्यात्मिक सोहळ्यात जे गेले ते श्रेष्ठच. ज्यांना काही कारणास्तव जाता आले नाही म्हणून त्यांनी अपराधीपणाची भावना मनात ठेवायची नाही. मन शांत असले की ते ईश्वराशी एकरूप होतेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT