Goa Opinion  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: "मी गोव्यातील हॉटेलमध्ये जेवताना जे ऐकलं ते ऐकून मान शरमेनं खाली गेली"

Goa Woman Incidence: गोव्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज असणं ही गोष्ट एकवेळ मान्य करता येण्यासारखी आहे मात्र गोव्यात राहणाऱ्या माणसाच्या मनात गोव्याबद्दल चुकीचे गैरसमज असणं याला खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

"गोव्यातील मुली या चांगल्या घराण्यातून आल्यासारख्या वाटत असतील पण....."

Goa News: गोवा या राज्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. गोव्यात वावरणारी लोकं आणि त्यांचं राहणीमान यांवर अनेकांकडून चुकीचा विचार केला जातोय. कतिया गोयेस पत्रकार महिलेने 'गोमन्तक टाइम्स'वर याच संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला होता. गोव्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज असणं ही गोष्ट एकवेळ मान्य करता येण्यासारखी आहे मात्र गोव्यात राहणाऱ्या माणसाच्या मनात गोव्याबद्दल चुकीचे गैरसमज असणं याला खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. या लेखाचा मराठी अनुवाद...

मी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. रात्रीच्या जेवणात दाल फ्राय आणि तंदुरी रोटी खात असताना झालेला प्रसंग मला आठवतोय. साधारण दहा बारा माणसांचा ग्रुप त्या रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत होता. रेस्टॉरंट त्या दिवशी बऱ्यापैकी रिकामं होतं आणि म्हणून का कदाचित त्या माणसाचं काहीसं बोलणं थेट कानावर यायचं. गोवा हे पर्यटनस्थळ आहे आणि पैकी पणजी हे शहर अधिक प्रसिद्ध असल्याने हे देखील पर्यटक असतील अशी समजूत माझ्या मनात होती.

त्या गटाच्या गप्पा सुरूच होत्या आणि अशातच त्यांपैकी एक माणसाने काही असे शब्द उच्चारले जे ऐकून गोव्यातीलच नाही तर कुठल्याही माणसाला नक्कीच राग येईल. तो माणूस बोलत होता की, "गोव्यातील मुली या चांगल्या घराण्यातून आल्यासारख्या वाटत असतील पण त्यांना सेक्ससोडून कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नाही.

" या वाक्यापेक्षा अधिक शरमेची गोष्ट म्हणजे त्या जागी उपस्थित सगळे यावर हसत होते. तो माणूस इथेच थांबला नव्हता तर पुढे असंही म्हणाला की, "गोव्यात सोलो ट्रॅव्हलिंगसाठी ज्या मुली येतेय त्या काही वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी नाही तर केवळ 'चांगला वेळ' घालवण्यासाठी.

ही सगळी चर्चा संपल्यानंतर तोच माणूस शेजारी बसलेल्या माणसासोबत अस्खलित कोंकणीमध्ये बोलू लागला. आत्तापर्यंत जिथे कतियासाठी तो एक पर्यटक (गोव्याबद्दल माहिती नसलेला), किंवा गोव्याबद्दल गैरसमजातून बोलणारा एक होता, त्याची व्याख्या अचानक बदलली. हा माणूस कुणी गोव्याबाहेरचा नसून गोव्यातलाच होता आणि दुर्दैवाने तो गोव्याबद्दल बोलत होता. या माणसाच्या वागणुकीतून अनेक प्रश्न उभे राहतात.

गोव्याचं चित्रं बॉलीवूडमुळे खराब होतंय असं आपण म्हणतो, पण मग जेव्हा एखादा गोव्यातील माणूस स्वतःच्या राज्याबद्दल किंवा त्याच राज्यातील मुलींबद्दल अपमानास्पद बोलत असेल तेव्हा नेमका दोष हा कोणाला द्यावा? विचार करायचा म्हटलं तर तो आपल्या राज्याची बदमानीच करत होता, भले तो त्याच्या मित्रांसोबतच का बोलेना!! मग अशावेळी सरकार त्याच्याविरोधात काहीच हालचाल नाही का करणार?

राग सहन न होऊन मी थेट जाऊन त्या माणसाला गाठायचं ठरवलं आणि त्याच्या या वागणुकीबद्दल प्रश्न देखील विचारले. यावर त्या माणसाने तो पणजीत तळगावमधला असल्याचं सांगितलं आणि पर्यटकांशी ‘टिप्स’ शेअर करत टूर ऑपरेटर असल्याचा दावाही केला. मी प्रचंड चिडली होती आणि माझा राग शांत करण्यासाठी, स्वतःच्या बोलण्याचं समर्थन करत तो माणूस स्वतःच्या घरी देखील आई आणि बहीण असल्याची भाषा बोलू लागला.

माझ्या या अनुभवावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आपल्याच घरात आपल्याबद्दल अफवा पसरवणारी, आपल्याला दूषणं देणारी लोकं असतात मग अशावेळी इतरांना बोटं दाखवून काय फायदा? आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन कसा असेल हे आपण ठरवू नाही शकत, मुलगी कशाप्रकारचे कपडे घालते यापेक्षा इतर नजरा तिच्याकडे कशा बघतात यावर अधिक विचार केला पाहिजे.

Gomantak Times वरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT