Nana Patekar Speech Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Nana Patekar Speech: 'हक्कांसाठी झगडा, भीक मागू नका, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा'; नानांचा विद्यार्थ्यांना दिलेला कानमंत्र चर्चेत

Nana Patekar Goa University Speech: प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

गंगाराम आवणे

पणजी: प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वी, ७ ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात ‘गोवा बिझनेस स्कूल’ अध्यासनातर्फे आयोजित ‘नाम फाऊंडेशन केस स्टडी’ कार्यक्रमात नानांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला होता. व्यासपीठावरून भाषण करण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आणि आपली परखड मतेही बिनधास्तपणे मांडली होती.

विद्यार्थ्यांची कोकणीतून ‘तुमी खंयचे?, गोंयचोच जाल्यार तुमी खंय रावता?’ अशी आपुलकीने विचारपूस करत नानांनी विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला होता. आपल्या वाक्चातुर्याने काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मिश्कील चिमटे काढण्‍यासही ते मागे राहिले नव्‍हते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नानांनी राजकारण, समाजकार्य आणि सरकारच्या भूमिकेवरही परखड भाष्य केले होते. तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपला उद्देश निश्चित करावा. राजकारणात येताना तुमच्याकडे काही नसेल, तर निवृत्त होताना अधिकचे काहीही असता कामा नये. समाजकार्य करताना खिसा रिकामा झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. दरम्‍यान, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोवा विद्यापीठाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गोव्यात जलसंवर्धनाची होती इच्छा

गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा वाहून जाते. त्यामुळे ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्राधान्य देत गोव्यात जलसंवर्धनाचे काम सुरू करण्याची इच्छा नाना पाटेकर यांनी व्यक्त केली होती.

तेव्‍हा खिसा रिकामा झाला पाहिजे

‘राजकारण वाईट आहे असे माझे मत नाही. मात्र तरुणांनी राजकारणात येण्यामागचा आपला उद्देश निश्चित करावा. राजकारणात येताना काही नसेल, तर निवृत्त होताना अधिकचे काहीही असता कामा नये. समाजकार्य करताना खिसा रिकामा झाला पाहिजे. सरकारकडे कामासाठी भीक मागू नका; हक्कांसाठी झगडा. भ्रष्टाचार दिसला तर तो चव्हाट्यावर आणा, असे नानांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: रंग त्याचा वेगळा...

Accident News: सोलर पार्कचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! ट्रेलर आणि बोलेरोची जोरदार टक्कर; 7 जणांचा जागीच मृत्यू

कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 'Kia Carnival'वर तब्बल 1.70 लाखांपर्यंत डिस्काउंट; एक्सचेंज, स्क्रॅपेज ऑफरमधूनही होणार मोठी बचत

IND VS PAK: क्रिकेट फॅन्ससाठी डबल सेलिब्रेशन! दिवाळीच्या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज महामुकाबला!

Nana Patekar Memories: हरणाच्या चामड्याचा ढोल अन् नानांची गोष्ट ऐकून स्तब्ध झालेले श्रोते; 'नटसम्राटा'च्या हळव्या मनाचा अविस्मरणीय किस्सा!

SCROLL FOR NEXT