Institute Menezes Braganza Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Institute Menezes Braganza: 150 वर्षांची सांस्कृतिक परंपरा! गोव्याच्या साहित्य-कला विश्वाचा आधार 'मिनेझीस ब्रागांझा'

Goa Cultural Heritage: इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचा वर्धापनदिन. कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रात कार्यरत ही संस्था दीड शतकाची परंपरागत गुढी घेऊन क्रियाशील आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मुकेश थळी

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचा आज वर्धापनदिन. कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रात कार्यरत ही संस्था दीड शतकाची परंपरागत गुढी घेऊन क्रियाशील आहे. आज संस्थेचा वर्धापनदिन, त्यानिमित्त थोडक्यात...

गोव्याच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि बौद्धिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा, पणजी अग्रस्थानी आहे. संस्थेची स्थापना २४ नोव्हेंबर १८७१ रोजी तत्कालीन पोर्तुगीज प्रशासनाने केली होती.‘इन्स्टिट्यूट वास्को द गामा’ या नावाने संस्थेला ओळखत. साहित्य, विज्ञान, कला आणि बौद्धिक चर्चांना प्रोत्साहन देणे हा संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता.

गोवा मुक्तीनंतर १९६३ साली संस्थेचे नामकरण गोव्याचे प्रख्यात पत्रकार, विचारवंत आणि राष्ट्रप्रेमी लुईस मिनेझीस ब्रागांझा यांच्या स्मरणार्थ करण्यात आले. पणजीच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या या संस्थेत इतिहास आणि वास्तुशिल्प यांचे बोल ऐकू आल्यासारखे भासतात. मिनेझीस ब्रागांझा संस्था गेली कैक वर्षे गोव्यातील साहित्य, भाषा, कला, संगीत, नाटक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक वारसा यांचे संवर्धन करण्याचे कार्य करीत आहे.

मराठी, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील साहित्यिक कार्यक्रम, परिसंवाद, व्याख्याने, ग्रंथप्रदर्शने, पुस्तक प्रकाशन सोहळे, काव्यवाचन, चित्रप्रदर्शने आणि संगीत संमेलने, सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन संस्था नियमितपणे करते. या कार्यक्रमात विविधता आहे. सातत्य आहे. चैतन्य आहे. आयोजन अतीव रेखीव असतं.

अध्यक्ष कवी दशरथ परब असून कलाकार अशोक परब हे सदस्य सचिव आहेत. यांचं प्रशासन कौशल्य व टीम वर्क सुसूत्र असल्याने कार्यक्रमांचं नियोजनबध्द व्यवस्थापन वेळेत होतं. उदाहरण द्यायचं तर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर यंदा जे बहुभाषिक कवी संमेलन झालं त्यात २३ कवी होते, तरीही वेळेत सुरू होऊन ते वेळेत संपलं याचं आश्चर्य साहित्यिकांना झालं. गेली अनेक दशके आम्ही मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. प्रश्‍नमंजुषा असो, वृत्तनिवेदन कार्यशाळा असो, कथा सादरीकरण असो वा इतर कार्यक्रम असो, तिथला माहोल मला कायम आनंदी स्पंदनांनी भरलेला आणि भारलेला वाटतो.

हल्लीच हिंदी अनुवाद विषयावर तिथं कार्यक्रम झाला होता. विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सहभाग उत्साहजनक होता. दिल्लीहून प्रा. उदय नारायण सिंग आले होते. व्यासंगी आणि विद्वान. ते इंग्रजीतही इतके सफाईदार बोलत होते की, वाटावं हे इंग्रजीचेच प्राध्यापक आहेत. भाषाशास्त्राविषयीच्या माझ्या शंका त्यांनी दूर केल्या. अशा महानुभाव मान्यवरांना, तज्ञांना बोलावल्यामुळे आयोजक संस्थेची उंची वाढते. साहित्य, कला, नृत्य, संगितातील दिग्गजांनाही बोलावलं जातं.

अलिकडच्या काळात संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले. बहुभाषिक महिला साहित्यिक मेळावा, स्वातंत्र्यसैनिक व कवी वामन सरदेसाय यांच्या कवितांवर आधारित संगीत कार्यक्रम, पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम झाले. गत सप्ताहामध्ये १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनही केले गेले. काही वर्षांपूर्वी संस्थेच्या नियतकालिकात चित्रकार लक्ष्मण पै यांच्या पेंटिंग्सवर डॉ. मनोहरराय सरदेसाय यांनी अप्रतिम लेख लिहिला होता.

कलेचं रसग्रहण करणारा इंग्रजीत मी वाचलेला हा एक अव्वल लेख. कसं लिहावं याचा वस्तुपाठ. आजही गोवापुरी हे संस्थेचं नियतकालिक साहित्य मेजवानी घेऊन येतं. संस्था ही केवळ कार्यक्रम आयोजित करणारी यंत्रणा नसते, तर ती प्रतिभांकुरांना व्यासपीठ देणारी, नवोदितांना प्रोत्साहन देणारी आणि समाजात सर्जनशीलतेचा दीप प्रज्वलित ठेवणारी चैतन्यशील चळवळ असते. या वाटचालीत योगदान देणारे संस्थेचे सर्व संस्थापक, पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि हितचिंतक अभिनंदनास पात्र आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russia Nuclear Satellite: अवकाशात अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवण्याच्या तयारीत रशिया? जर्मनीच्या गुप्तचर रिपोर्टने खळबळ; नाटो देशांची वाढली धाकधूक

Shirgaon Mining Impact: खाणकामातून हजारो कोटींची कमाई, पण गावाचे पाणी, शेती अन् रोजगार संकटात

VIDEO: प्रियांश आर्यचा 'रुद्रावतार'! 266 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई; 19 षटकार आणि 7 चौकारांसह कुटल्या 181 धावा

Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

Bangladesh Violence: बांगलादेशात राजकीय संघर्ष शिगेला! शेख हसीना यांच्या समर्थकांच्या रॅलीवर हल्ला; गोपालगंजमध्ये जाळपोळ आणि तोडफोड VIDEO

SCROLL FOR NEXT