Goa Tribal Employees Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Tribal Employees: गाडी, माडी अन् बायकोची गोल गोल साडी! गोविंद गावडेंचा टोमणा अन् 'उटा'च्या 10 टक्के वर्गणीचा थेट हिशोब

UTA Funding Appeal: गोल गोल’ साडीचा उल्लेख असलेले ‘माझी साडी, माझी गाडी, माझी उंच उंच माडी! गाडीत बसून कुठे जाणार?

दैनिक गोमन्तक डिजिटल

डॉ. मधु स. घोडकिरेकर

गोंविंद गावडे थेट आरोप करतात, की येथील आदिवासी सरकारी कर्मचारी आपली गाडी, आपली माडी व आपल्या बायकोची गोल गोल साडी’ यामध्येच मग्न असतात. ‘उटा’ आंदोलनाचा सर्वात जास्त फायदा त्यांना झाला पण ते ‘उटा’ला आर्थिक मदत करीत नाहीत. आमदार-मंत्री पदावर पोहोचलेले नेते समाजाच्या व्यासपीठावरून बोलतात तेव्हा त्यांच्याकडून सौजन्याच्या भाषेची अपेक्षा असते.

गोल गोल’ साडीचा उल्लेख असलेले ‘माझी साडी, माझी गाडी, माझी उंच उंच माडी! गाडीत बसून कुठे जाणार? मामाच्या गावाला पळून जाणार !’ हे बालगीत तर, ‘माझी साडी, माझी गाडी, माझ्या बायकोची गोल गोल साडी! साडीवरून घरसला लाडू, अमुकची आजी खायला लागली झाडू’ हे बडबडगीत. ही दोन्ही गीते पुष्कळ जुनी व पूर्णपणे मौखिक स्वरूपाची आहेत. या बालगीताचा नूर पकडून हल्लीच्या काळात ‘माझी साडी, माझी गाडी, माझ्या बायकोची गोल गोल साडी!’ या नावाची एक जुनी विनोदी कविता प्रसिद्ध आहे.

या कवितेचा आशय असा की दिवसभर कामावर थकून नवरा घरी येतो, तेव्हा त्याला त्याची बायको त्याला गरम गरम चहा देते, भजी देते वैगेरेंचा क्रम येथे सांगितला जातो. यातील शेवटची तीन कडवी, ‘दिवसभराचा थकवा क्षणात पळून जावा, संसारात असाच नेहमी गोडवा असावा. उगीच कशाला दुसऱ्याच्या सुखावर डोळा ठेवायचा? आपल्याच घरात आपण राजासारखे जगायचे! कष्टाच्या कमाईवर असावा आपल्याला अभिमान, आपल्याच माणसात दडलाय खरा आनंद आणि मान!’ अशी आहेत. ‘चाकरमानी हे आत्मकेंद्रीत व स्वार्थी लोक असतात’ असे सांगणारी ही कविता नसून चाकरमान्याच्या गृहिणीचे त्यांच्या संसरात काय योगदान असते, याची महती सांगणारी ही कविता आहे.

येथे ‘गाडी –माडी–साडी ’ यांचा उल्लेख पूर्णपणे काव्यात्मक व गुणात्मक अर्थाने केला आहे.परवा माझ्या एका साहत्यिक मित्राने, प्रकाश वेळीप यांनी आदिवासी कर्मचाऱ्यांसाठी मदतीकरिता निधीसाठी केलेल्या आवाहनाच्या बातमीचे कात्रण ‘गोल गोल साडीचे दर ठरले’ असे कॅप्शन देऊन पाठवले. यामागचे कारण असे की ‘उटा’च्या मंचावरून आपले राजकरणी समजा बंधू, गोंविंद गावडे थेट आरोप करतात, की येथील आदिवासी सरकारी कर्मचारी आपली गाडी, आपली माडी व आपल्या बायकोची गोल गोल साडी’ यातच मग्न असतात.

‘उटा’ आंदोलनाचा जास्त फायदा त्यांना झाला पण ते ‘उटा’ला आर्थिक मदत करीत नाहीत.आमदार-मंत्री पदावर पोहोचलेले नेते समाजाच्या व्यासपीठावरून बोलतात तेव्हा त्यांच्याकडून सौजन्याच्या भाषेची अपेक्षा असते, सडेतोड बोलणे वर्ज्य नाही, पण अपमानास्पद बोलणेही तेवढे स्वागतार्ह नाही. कर्मचारी असलेल्या नवऱ्याकडून ‘उटा’ला दहा बारा हजार रुपये देत नाही म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या बायकोच्या गोल गोल साडीचा मुद्दा काढायची गरज नाही. बडबड गीते मुलांच्याच तोंडात शोभतात म्हणून ती प्रौढांच्या तोंडात शोभतीलच असे नाही, याची समज गोविंद गावडेंसारख्या नाट्यकर्मीला असणे अपेक्षित आहे.

आताचे सदर सार्वजनिक आवाहन व गोविंद गावडेंचा गोल गोल साडीचा सिद्धांत, यांचा एकत्रितपणे ताळेबंद मांडल्यास हिशोब सरळ ठरतो. ज्या आदिवासी कर्मचाऱ्यांना ‘गोल गोल साडी’चा टोमणा ऐकून अपराधीपणा वाटतो, त्यांनी सदर दहा टक्के ‘फी’ ‘उटा’ तिजोरीत जमा करून अपराध मुक्त व्हावे, म्हणजे एक प्रकारचे शुद्धीकरण. पुढे कधी ‘उटा’च्या कार्यक्रमात जात असाल तर या पेमेंटचा ‘स्क्रीन शॉट’ मोबाइलमध्ये ठेवा. आमदार-मंत्र्यांनी परता तोच टोमणा परत मारला तर, ‘हा टोमणा आता मला लागू होत नाही’ असे दाखविण्यासाठी तो ‘स्क्रीन शॉट’ शेजारी बसलेल्यांना दाखवा, म्हणजे परत अपराधीपणा जाणवणार नाही.

तसे पाहता, वरील टोमणे मारताना गावडेंचा रोख सगळ्या सात हजार (सरकारी व निमसरकारी) आदिवासी कर्मचाऱ्यांवर नसावा. कारण, ‘उटा’चे आंदोलन झाले त्या वर्षी आधीच आदिवासी कर्मचारी संख्या चार हजारांच्या जवळपास होती. त्यातील सोळाशे कर्मचारी महिला असल्याने ‘बायकोची गोल गोल साडी’ हा टोमणा त्यांना लागू होत नाही. २४०० पुरुष कर्मचाऱ्यांपैकी कितीजणांची ‘उटा’ आंदोलनामुळे प्रगती झाली, ही माहिती ‘उटा’च देऊ शकेल, पण ही संख्या दोनशेवर असू शकत नाही.

म्हणजेच यातील राहिलेल्या कर्मचाऱ्यांना ‘उटा’ आंदोलनानमुळे फरक न पडल्याने, ‘उटा’ त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. पुढे २०१४ ते २०१९ या दरम्यान एकूण १८०० आदिवासी कर्मचाऱ्याची भरती झाली, ज्यात पुरुष संख्या ७८३ अशी होती, ज्यांना हा गोल गोल साडीचा टोमणा लागू पडू पडतो. त्यापुढील पाच वर्षात म्हणजे सन २०२४ पर्यंत अजून १४०० आदिवासी कर्मचाऱ्यांची भर पडली, त्यात पुरुष संख्या ८०३ अशी होती.

थोडक्यात, ‘गोल गोल साडीचे सिद्धांत’ वापरून उटा ज्या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दहा टक्के नैतिक हक्क सांगते ती, संख्या पंधराशे ते सतराशे अशी आहे. या सतराशे कर्मचाऱ्यांनी ठरविलेल्या दरानुसार ‘उटा’साठी दानधर्म करायला हवा, असे ‘उटा’ला वाटत असेल तर सदर आवाहन पत्रिका जगजाहीर करण्यापेक्षा थेट याच कर्मचाऱ्यांकडे पोहोचवायला हवी होती. ‘सरकारी तिजोरीतून घेतलेला पगार सरकार विरोधी आंदोलनासाठी जमा करा, असे सार्वजनिक आवाहन करणे शिष्टाचारात बसते का?

हा सार्वजनिकरित्या विचारला जाणारा प्रश्न टाळता आला असता. समाजासाठी मदत टक्केवारीने कधी मागितली जात नाही, आमदार-मंत्री यांच्याकडे टक्केवारीनुसार रकमा पोहचतात, तो विषय वेगळा. शेवटी, गोल गोल साडीचे राहून गेलेले अजून एक बडबड गीत : ‘माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची गोल गोल साडी! ... साडीला लावला लाल लाल टिकला, ‘अमुक’चा फुगा पटकन फुटला!’ आमचे राजकरणी नेते यापुढे ‘गोल गोल’ साडीचा उल्लेख करताना हे बडबडगीतही आठवणीत ठेवतील, अशी आशा करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT