Goa Monsoon Rainfall Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Monsoon Rainfall: हवामानाचा लहरीपणा अन् मानवी भविष्याची भीती

Climate Change In Goa: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणांच्या पाणीसाठ्यांबद्दलच्या बातम्यांनी मनात थोडी भीती निर्माण झाली होती .

दैनिक गोमन्तक डिजिटल

डॉ. परेश कु. देसाई

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणांच्या पाणीसाठ्यांबद्दलच्या बातम्यांनी मनात थोडी भीती निर्माण झाली होती . पाऊस आणखी महिनाभर लांबला तर काय होणार ह्याची कल्पना करून मनात कधीनव्हे एवढी दुष्काळाची भीती वाटत होती.

मी आणि माझा एक डॉक्टर मित्र दरवर्षी वेधशाळेचा अंदाज, वेगवेगळ्या हवामान भाकित यांची चर्चा अधून मधून करत असतो. आमच्या चर्चेमधे एकमेकांच्या वाचनातील सत्यासत्यता पडताळून पाहायची एक प्रयत्न असतो. गोव्यात चांगला धो -धो पाऊस पडला आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली तर आम्हाला आनंद होतो.

आम्हा भारताच्या पश्चिम तटावरील लोकांना जूनच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी मॉंसूनच्या आगमनाकडे डोळे लावून वाट पाहण्याची सवय झाली आहे. भारतीय वेधशाळेने यावर्षी आधीच भाकीत केलं होतं की, मॉंन्सूनचं आगमन लांबणार. जूनच्या उत्तरार्धात पावसाच्या सरी बऱ्यापैकी पडल्या, सगळ्यांना मनात हाय झालं. उशिरा का होईना पण पाऊस पडला ह्याचं समाधान वाटलं असेल बहुधा.

एकदा पाऊस पडायला लागला की, सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शेतकरी सुखावले, गोव्यात उन्हाळ्याच्या असह्य उकाड्याने हैराण माझ्यासारखे शहरी भागातील लोक पण खुश झाले, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी पण आनंद साजरा केला असेल. जुलै आला आणि पावसाचा जोर परत कमी झाला. गोव्यात जुलै पर्यंत जवळ -जवळ ३५ ते ४० टक्के कमी झाला आहे. यावर्षीचा पावसाच्या बाबतीतला हा हवामान बदल काय सूचित करू इछितोय, हा आम्हा मानवांना एक गर्भित इशारा तर नाही ?

मानव जातीने निसर्गातून मिळणाऱ्या फुकट गोष्टी म्हणजे पाणी आणि ताजी हवा ह्यांना जणू काही गृहीतच धरलं आहे. काही दशकांपूर्वी गोव्यात आतासारखी बरीच धरणे अस्तित्वात नव्हती. पाणीपुरवठा सुरळीत नव्हता. बहुंताश लोक विहिरीवर अवलंबून होते. माझ्या बालपणी काणकोण सारख्या तालुक्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी खूप कसरत करावी लागत असे. पूर्ण तालुक्यामध्ये बऱ्याचशा विहिरी सुकायच्या. आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पिण्याचं पाणी दूरवरच्या विहिरीतून आणायचं, बाकीच्या उपयोगाचा पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे व्हायचा.

ह्यातूनच आम्ही पाण्याचा अपव्याय कसा टाळावा हे शिकलो. पुढे माझी रवानगी काणकोणच्या नवोदयच्या निवासी शाळेत झाली. तिथली ७ वर्षेही उन्हाळ्यात आम्ही पाण्याची कमतरता अनुभवली. आम्ही मुलं खूप मेहनत करून आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी उन्हाळ्यात रोज बोअर वेल मधून पाणी काढायचो.

नंतर राज्यभर बऱ्यापैकी धरणांची निर्मिती झाली आणि पाणीपुरवठा सुरळीत होऊन बहुतांश ठिकाणी चोवीस तास पाणी उपलब्ध झाले. आजच्या पिढीने गोव्यात उन्हाळ्यातले पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे ते दिवस पाहिले नाहीत. ज्यांनी स्वतः शेतातील उभं पीक अतिवृष्टीनं आडवं झालेलं किंवा पावसाच्या अभावी मेहनत करून केलेलं हिरवंगार पीक सुकून पांढरं झालेलं पाहिलंय, त्यांनाच विदर्भ-मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची व्यथा समजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT