Goa Beach Event  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion : आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Goan Cultural Loss : गतिमान संक्रमणात आपण मिळवण्यापेक्षा अधिक गमावले आहेत. आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, आमच्या नद्या प्रदूषित होत आहेत, बेकायदेशीरपणे जमिनीचे रूपांतरण होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळ मी माझे जीवन गोव्याच्या मूर्त आणि अमूर्त वारशाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले आहे. अनेक अडचणींचा सामना करत मी त्यातील एक एक वस्तू जमवल्या आहेत. वारशाच्या प्रेमामुळे सुरू झालेली ही कहाणी आहे.

दुर्लक्ष होऊन किंवा कुणाच्यातरी लोभामुळे अस्तंगत होण्यापूर्वी हा वारसा जतन करणे हे आता माझे आयुष्यभराचे ध्येय बनले आहे. अर्थात, हा वारसा अनुभवण्यासाठी, त्याचे साक्षीदार बनण्यासाठी लोकांनी लावलेली आपली उपस्थिती, त्यांचे मिळालेले प्रोत्साहन आणि त्यांचा विश्वास यामुळे हे स्वप्न सर्वात कठीण काळातही जिवंत राहिले. 

तरीदेखील आज मला दुःखाचा स्पर्श मला जाणवतो आहे. माझ्या आयुष्यात गोवा वेगळ्या प्रकारे विकसित व्हावा असे मला वाटत होते, मात्र मासेमारीच्या जाळ्यातून हटून होऊन आज गोवा इंटरनेटच्या आंतरजालावर अडकलेला दिसतो आहे.

या गतिमान संक्रमणात आपण मिळवण्यापेक्षा अधिक गमावले आहेत. आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, आमच्या नद्या प्रदूषित होत आहेत, बेकायदेशीरपणे जमिनीचे रूपांतरण होत आहे, आमचे जलसाठे  बुजवले जात आहेत, आमची वारसा घरे उद्ध्वस्त होत आहेत, आमची गांवकरी व्यवस्था विसरली गेली आहे.

आमच्या पूर्वजांनी रक्त, घाम आणि अश्रू वाहून बांधलेली प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे नष्ट केली जात आहे. पर्यावरणीय उदासीनता, अदुरदर्शी विकास आणि सांस्कृतिक दृष्टीचा अभाव हे यामागचे कारण आहे हे स्पष्ट आहे. 

मात्र तरीही मी आशेचा त्याग करण्यास नकार देतो. माझे स्वप्न कधीही निराशेचे नव्हते तर ते पुनर्प्राप्तीचे होते. आज प्रत्येक गोमंतकीयाला आणि गोमंतक प्रेमीला एकत्र येणे गरजेचे आहे. आपण जे गमावले त्याचा शोक आपण सोडून देऊ आणि जे अजूनही आपल्याकडे आहे त्याचे रक्षण आणि जतन करण्यासाठी आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एकत्र येऊ. 

आपण हे लक्षात ठेऊ की गोवा हे फक्त एक स्थान नाही तर ती एक जीवनशैली आहे, तो एक सामाजिक वारसा आहे, ती एक जिवंत स्मृती आहे जी भावी पिढीसाठी आम्ही जपली पाहिजे. जर आपण आताच पावले उचलली नाहीत तर मात्र आपल्याकडे काहीही उरणार नाही. 

विक्टर ह्यूगो गोम्स 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT