Goa Diwali noise pollution controversy Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

राजकारण्यांच्या आशीर्वादाने गोव्यात 'नरकासुर युग'? चौका-चौकांत नरकासुर, डीजेचा गोंगाट अन् पोलिसांची उदासीनता

Goa Diwali noise pollution controversy: गोव्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने घडलेल्या ध्वनी प्रदूषणाने, नरकासुरांच्या धुडगुसाने अस्तित्वाचे अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने घडलेल्या ध्वनी प्रदूषणाने, नरकासुरांच्या धुडगुसाने अस्तित्वाचे अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे ‘नरकासुर युग’ निर्माण झाल्याचा आरोप सहज करता येईल, परंतु तरुणाईचा हा बीभत्स आविष्कार आहे. त्याविरोधात कोणताही प्रमुख राजकीय पक्ष आवाज उठवताना दिसत नाही. केवळ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने त्याविरोधात मतप्रदर्शन केले आहे.

तो नरकासुर उत्सव अवघ्या काही वर्षांत एवढे ओंगळवाणे, गलिच्छ स्वरूप धारण करेल व आनंददायी उत्सवाला गालबोट लावेल याची कल्पनाही कोणी केली नसेल! न्यायालयाने आदेश जरूर दिले, परंतु पोलिसांची उदासीनता दृष्टीस आली. गोव्यामध्ये या दिवाळीने आपल्या ज्येष्ठ नागरिकांना, विशेषतः वृद्ध नागरिकांना दोन रात्री शांत झोप घेण्याचीही संधी दिली नाही. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही, डीजे सिस्टिमचा कलकलाट आणि फटाक्यांचा कोलाहल मध्यरात्रीनंतर सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिला.

हा केवळ दिवाळीचा उत्सव नाही - हा आमच्या कायद्याचाही अपमान आहे. माणुसकीलाही या प्रवृत्तीने काळिमा फासला! पोलिसांनी अपेक्षित गतिशीलता दाखवली नाही. काही ठिकाणी उपकरणे जप्त केली गेली, तर अनेक ठिकाणी सरकारच्या समर्थनाअभावी कारवाई रखडली. हे दु:खद असून कायद्याची अंमलबजावणी हेच आमच्या पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे, पण ते पूर्ण होत नाही. आपल्या काही नेत्यांचा हस्तक्षेप, हेही पोलिसांच्या संथ कारवाईमागचे मुख्य कारण मानावे लागेल.

एक गोष्ट खेदपूर्वक मान्य करावी लागेल, की आपली संस्कृती बदलतेय; पण कायदा कायम राहणे आवश्यक आहे याचे भान कोणाला नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या साऊंड सिस्टिम आणल्या जातात. उत्तर भारतीय नागरिकांचा प्रवाह वाढला आहे आणि त्यांच्यासह भारी फटाक्यांची परंपरा गोव्यात आली आहे. हे आपल्या गोव्याचे परंपरागत रीतिरिवाज नाहीत. धार्मिक प्रथा - परंपरांचे कारण देऊन कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आता निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. कोणताही धर्म, कोणतीही संस्कृती असो, सर्वांनी नागरी जबाबदारीचे पालन करणे अनिवार्य आहे. शिवाय राजकारण आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील अंतर वाढत असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवते.

राजकारणी नरकासुर पुरस्कृत करतात व चौका-चौकांत अनेक नरकासुर उभे केले जातात. या प्रायोजित कार्यक्रमांचा कानठळ्या बसवणारा आवाज सर्वत्र पोहोचतो. यावर्षी तर एकाच वेळी, एकाच ठिकाणी तीन तीन नरकासुर उभे केले गेले व त्यांनी प्रचंड गोंगाट निर्माण केला. त्याबाबत काही नीतिनियम, सुधारणा आवश्‍यक असून आता नाही, तर कधीही नाही असा ठोस निर्णय घेणे आवश्‍यक बनले आहे. दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे

पण परिपक्व समाजातील आनंद, उत्साह साजरा करताना दुसऱ्यांचे अधिकार हिरावून घेऊ नयेत. सरकार आणि पोलिस यांनी कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. रात्री १०.०० वाजेपर्यंत संगीत - त्यानंतर शांतता अनिवार्य. दिवाळीच्या दिवशी १२ पर्यंत संगीताला मुभा दिली असेल, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. पोलिस दलांना पुरेशी मदत आणि अधिकार देणे आवश्‍यक आहे. तेथे नेत्यांनी अनावश्‍यक लुडबूड करू नये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांची झोप, आपल्या संवेदनशील मुलांचे आरोग्य, आपल्या शहराची शांतता - ही राज्याच्या दायित्वाची यादी आहे. दिवाळी लक्ष्मीचा उत्सव आहे.

पण जर आपण लक्ष्मी पूजन साजरे करताना नागरिकांचे अधिकार हिरावून घेऊ लागलो, तर तो भारतीय उत्सव व तत्त्वांचा पराभव ठरेल. तो आपल्या परंपरांचाही अपमान आहे. समय बदलला आहे. शांततापूर्ण सहजीवनाचाही विषय आहे. गोवा बदलतो आहे. कधी नव्हे ते त्याचे बीभत्स स्वरूप आपण या दिवाळीत पाहिले. उद्या तो आणखी विकृत स्वरूप धारण करू शकतो. पोलिस, राज्य आणि नागरिक - सर्वांनी एकत्रितपणे या विषयावर गंभीरपणे तोडगा काढला पाहिजे. नागरी समाजाने तर अत्यंत ठोस, कठोर भूमिका घेतली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाले आजोबा! कोब्राला निळ्या ड्रममध्ये कोंडताच धरला ठेका, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Weather Update: ऐन हिवाळ्यात उन्हाचा तडाखा; तापमानाचा पारा 36 अंशांवर, म्हापशात 38.8 अंशांची नोंद; उष्म्याने लोक हैराण

Accident Death: दिवाळीत काळाचा घाला; अपघातांत तिघांचा मृत्‍यू, दोडामार्ग येथे अपघातात दोघांचा मृत्यू; वास्को येथील दुचाकीस्वार जागीच ठार

Mudukud Mobile Network Outage: संपर्क साधायचा कसा? मुडकूडमध्ये 20 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क ठप्प! नागरिकांची मोठी गैरसोय

आरोपीला 48 तासांत अटक करा; 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी काँग्रेस आक्रमक, म्हापसा पोलिस ठाण्यावर धडक

SCROLL FOR NEXT