Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Tourism: 'चटईची जागा शॅक्सनी घेतली, चहाच्या जागी दारु आली'; बीचवर आता गोमंतकीय उबदारपणा उरलाय का?

Goa Beach Shacks: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शॅक्सच्या रांगा उभ्या असलेल्या दिसतात. विविध कारणांनी हे शॅक्स आज चर्चेचा विषय झालेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

ऑगस्टो रॉड्रिगीज

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शॅक्सच्या रांगा उभ्या असलेल्या दिसतात. विविध कारणांनी हे शॅक्स आज चर्चेचा विषय झालेले आहेत. सर्वात प्रथम जेव्हा ते किनाऱ्यावर अवतरले होते तेव्हा त्यांचे स्वरूप खूपच वेगळे होते. एक कप चहाचा आनंद घेणे किंवा बाटलीबंद पाणी पिणे किंवा पुड्यामधील बिस्किटांचा स्वाद घेणे या मर्यादेतच ते होते.‌

त्यांचा काउंटर म्हणजे एक साधारणसे टेबल असायचे. समुद्र स्नानासाठी आलेल्या परदेशी लोकांसाठी आपले सामान ठेवण्यासाठी ते सर्वात सुरक्षित ठिकाण होते.‌ मुळातच गोव्यात शॅक्सची संकल्पना हिप्पींच्या आगमनानंतर सुरू झाली. 

समुद्रकिनाऱ्याला, विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत, भेट देणारे स्थानिक समुद्रकिनाऱ्यावर रांगेने लावलेल्या होड्यांच्या सावलीत बसून ऊन आणि वाऱ्यापासून आपला बचाव करत असत. पोहून आल्यानंतर जेवणाचा डबा उघडला जात असे, ज्यात भाजी पुरी, फळे आणि घरी बनवलेले अन्नपदार्थ असत.‌ त्याकाळी समुद्रकिनाऱ्याला भेट देणे हा जणू एक कौटुंबिक व्यायाम असायचा. किनाऱ्यावर अंथरलेल्या चटईवरचे हे कौटुंबिक बंध शॅक्समध्येही पहायला मिळायचे.

चटई घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जाणे ही एक परंपरा होती जी किनाऱ्यावर टेबल-खुर्च्या, उच्च दर्जाची म्युझिक सिस्टम आल्यानंतर नाहीशी झाली. लवकरच चहाची जागा मद्याने घेतली; विशेषतः बियर जी त्याकाळी बर्फाचे तुकडे असलेल्या‌ क्रेट्समध्ये ठेवली जात असे. बाटल्यांचा थंडपणा टिकवण्यासाठी त्यावर मीठ आणि वाळूची फवारणी व्हायची. 

आताचे शॅक्स इतके आधुनिक झाले आहेत की तिथे वॉशरूम असणे बंधनकारक आहे आणि समुद्रात पोहल्यानंतर ज्यांना आंघोळीची गरज भासते त्यांच्यासाठी शॉवरची तजवीजदेखील झालेली आहे. पण पूर्वी शॅक्समध्ये अशी कुठलीच सोय नव्हती.

समुद्रात पोहून झाल्यानंतर अंग उन्हातच सुकवले जायचे किंवा जर जवळच विहीर असली तर एखादा नशीबवान तिथं जाऊन डोक्यावरून पाणी ओतून घ्यायचा. पण बहुतेकदा समुद्र स्नानानंतर घरी परतीचा प्रवास खारट अंगानेच व्हायचा. 

काही काळानंतर बहुतेक शॅक्स मासे मिळण्याच्या लोकप्रिय जागा बनल्या. कुठल्या शॅक्समध्ये ताजे मासे मिळतील ही स्पर्धा अजून सुरू झाली नव्हती. माशांच्या पदार्थांच्या बाबतीत शॅक्समध्ये सर्वोत्तम विविधता होती. पुरुष मासे पकडून आणत आणि स्त्रिया मासे साफ करून ग्राहकांना माशांचे पदार्थ सर्व्ह करत असत.‌ मग हळूहळू तिथल्या सांस्कृतिक शिष्टाचारांनी पाश्चात्य गुण आत्मसात केले आणि विचार वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायला लागले.

काय परिधान करावे, कोणते संगीत ऐकावे यापासून धूम्रपानाच्या शैलीत देखील बदल झाला. स्थानिक तंबाखूपासून वळली जाणारी विडी जाऊन सिगरेट आली आणि तंबाखूच्या पाऊचसह सिगरेटचे कागद त्या जागेत दिसू लागले. 

आता तर सारेच बदलले आहे. स्थानिकांचे शॅक्स बाहेरील लोक चालवत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक कमी होऊन बाहेरील लोकांची गर्दी वाढलेली आहे. ही निवड आम्हीच केली आहे.

गोव्याचे कोणतेच वैशिष्ट्य नसलेल्या शॅक्स नामक झोपडीला इथल्या जमिनीचा पाया राहिलेला नाही. स्थानिक वैशिष्ट्ये नसलेल्या समुद्रकिनाऱ्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही. गोव्यात पर्यटक म्हणून येणाऱ्या पाहुण्यांना गोमंतकीय  उबदारपणा आणि सुरक्षितता पुन्हा अनुभवता यावी यासाठी आम्ही आमच्याच कृतींकडे आणखी एक नजर टाकण्याची आज गरज आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT